Tarun Bharat

मोठय़ा भावाचा लहान भावाकडून खून

श्रीनगर झोपडपट्टीतील घटनेने खळबळ, लहान भावाला अटक : पुढील तपास सुरू

प्रतिनिधी /बेळगाव

दारू पिऊन त्रास देणाऱया मोठय़ा भावाचा लहान भावाने चाकूने भोसकून खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री श्रीनगर येथील आश्रय कॉलनी, श्रीनगर गार्डनजवळ परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी लहान भावाला अटक केली आहे.

प्रकाश शंकर बसकरी (वय 32) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा लहान भाऊ महेश शंकर बसकरी (वय 27) याने चाकूने पोटावर वार करून व गळा चिरून प्रकाशचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. शनिवारी मध्यरात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

उपलब्ध माहितीनुसार प्रकाश दारुच्या नशेत येऊन कुटुंबातील सगळय़ांशी भांडायचा. शनिवारी रात्रीही नशेत त्याचे भांडणाचे प्रकार सुरू झाले. याचवेळी आईला धक्का मारत घरातील चाकू घेऊन दिसेल त्याच्यावर चाकू घेऊन धावू लागला होता. त्याचवेळी महेशने त्याच्याच हातातील चाकू हिसकावून घेऊन त्याच्या पोटावर सपासप वार केले.

या हल्ल्यामुळे प्रकाश खाली कोसळला. त्यावेळी चाकूने त्याचा गळाही चिरण्यात आला. रक्तस्राव होऊन जागीच त्याचा मृत्यू झाला. मध्यरात्री माळमारुती पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मोठय़ा भावाच्या खुनानंतर घरीच थांबलेल्या महेशला पोलिसांनी अटक केली. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून प्रकाशचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तर महेशची वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली.

Related Stories

उचगाव साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीचे नेतृत्त्व लोकमान्य सोसायटीकडे

Patil_p

पदवीपूर्व क्रीडा स्पर्धेत महिला गटात आरपीडीला सर्वसाधारण विजेतेपद

Patil_p

बसवण कुडचीत मरगाई देवीची प्रतिष्ठापना-कळसारोहण

Amit Kulkarni

काळय़ा नदीवरील झुलत्या पुलाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Omkar B

टोळक्याकडून कामगाराला मारहाण

Amit Kulkarni

बेळगावला मिळणार लसींचे 4 लाख डोस

Patil_p