Tarun Bharat

मोठय़ा विजयासह भारत उपांत्यपूर्व फेरीत

Advertisements

यू-19 विश्वचषक : सामनावीर हरनूर सिंग, रघुवंशी यांची अर्धशतके, हंगरगेकरची फटकेबाजी

वृत्तसंस्था /तरोबा (त्रिनिदाद)

चार वेळा युवा विश्वचषक जिंकणाऱया भारताच्या युवा संघाने आयर्लंडचा 174 धावांनी एकतर्फी धुव्वा उडवित यू-19 विश्वचषक स्पर्धेच्या सुपरलीग उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. 88 धावांचे योगदान दिलेल्या हरनूर सिंगला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे सामन्याआधी भारताच्या सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उर्वरित 11 खेळाडूंना खेळविण्यात आले होते. अन्य एका सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा 7 गडय़ांनी पराभव केला.

भारताने द.आफ्रिकेचा पहिल्या सामन्यात पराभव करून या स्पर्धेची शानदार सुरुवात केली होती. बुधवारच्या दुसऱया सामन्यात त्यांनी दुबळय़ा आयर्लंडचा मोठय़ा फरकाने पराभव करून बाद फेरीत स्थान मिळविले. प्रथम फलंदाजी मिळाल्यावर हरनूर सिंगच्या जलद 88 व त्याचा जोडीदार अंगकृश रघुवंशीच्या 79 धावांच्या बळावर भारताने 50 षटकांत 5 बाद 307 धावांचा डोंगर उभा केला. या जोडीने सलामीच्या गडय़ासाठी 164 धावांची भागीदारी केली. त्यानंतर भारताने आयर्लंडचा डाव 39 षटकांत 133 धावांत गुंडाळून मोठा विजय साकार केला. नियमित कर्णधार यश धुळ व उपकर्णधार शेख रशीद आयसोलेशनमध्ये असल्याने निशांत सिंधूने संघाचे नेतृत्व केले.

हरनूर-रघुवंशी यांनी दीडशतकी सलामी देत भारताच्या डावाची भक्कम पायाभरणी केली. हरनूरने 101 चेंडूच्या खेळीत 12 चौकार मारले तर रघुवंशीने 79 चेंडूत 10 चौकार, 2 षटकार फटकावले. याशिवाय निशांत सिंधूने 34 चेंडूत 36 व राज बावाने 64 चेंडूत 42 धावा जमविताना तिसऱया गडय़ासाठी 64 धावांची भागीदारी केली. अखेरच्या टप्प्यात धावांचा ओघ कमी झाला असे वाटत असतानाच राजवर्धन हंगरगेकरने जबरदस्त फटकेबाजी करीत 1 चौकार, 5 षटकारांच्या मदतीने केवळ 17 चेंडूत नाबाद 39 धावा झोडपल्याने भारताला तीनशेची मजल मारता आली. आयर्लंडच्या मुझमिल शेरजादने 3, हम्पेस, डोहर्टी, जेमी फोर्बेस यांनी एकेक बळी मिळविले.

308 धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडची खराब सुरुवात झाली. सहा षटकांत त्यांचे 17 धावांत 3 गडी बाद झाले. यातून आयर्लंड संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. टिम टेक्टरने 15 व जोशुआ कॉक्सने 28 धावा जमविल्या. त्यांचा निम्मा संघ 66 धावांत तंबूत परतला होता.

संक्षिप्त धावफलक

यू-19 भारत 50 षटकांत 5 बाद 307 ः रघुवंशी 79, हरनूर सिंग 88, राज बावा 42, निशांत सिंधू 36, हंगरगेकर 17 चेंडूत नाबाद 39, तांबे 5, अवांतर 17, मुझमिल शेरजाद 3-79, हम्प्रेस 1-69, फोर्बेस 1-38. आयर्लंड 39 षटकांत सर्व बाद 133 ः मॅकबेथ 32, जोशुआ कॉक्स 28, हम्प्रेस 16, टेक्टर 15, नाथन मॅकग्वायर 14, तांबे 2-8, गौतम 2-11, सांगवान 2-23, हंगरगेकर 1-17, रवि कुमार 1-11, ओस्तवाल 1-22.

Related Stories

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध राजस्थानचे तीन‘तेरा’दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध राजस्थानचे तीन‘तेरा’

Omkar B

मेसीच्या गैरहजेरीत बार्सिलोनाचा विजय

Patil_p

सविता, कपिल यांचे आव्हान समाप्त

Patil_p

रोहित शर्मा कोरोनाबाधित

Patil_p

लंका संघाची घोषणा, शनाकाकडे नेतृत्व

Patil_p

ऑस्ट्रेलियाची इंग्लंडवर मात

Patil_p
error: Content is protected !!