Tarun Bharat

मोदींआगोदरच सपाकडून पूर्वांचल एक्सप्रेस-वेचं उद्घाटन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील 341 किलोमीटर लांबीच्या पूर्वांचल एक्सप्रेस-वे चे उद्घाटन सुल्तानपूर येथे होणार आहे. या वेळी खास एअर शो आयोजित करण्यात आला असून, पीएम नरेंद्र मोदी स्वत: एअरफोर्सच्या सी-130 जे सुपर हरक्युल्स विमानामधून येणार आहेत. एअरफोर्सच्या इतर फायटर विमानांचेही याच एक्सप्रेस -वे वर टेकऑफ आणि लँडिंग होणार आहे. मात्र, या उद्घाटन सोहळ्यापूर्वीच समाजवादी पार्टीने या एक्सप्रेस-वे चं सांकेतिक उद्घाटन केले आहे.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या सांकेतिक उद्घाटनाचे फोटो ट्विट करत समाजवादी पक्षाच्या कामाचं श्रेय भाजपने पळवल्याचा आरोप केला आहे. ”फीत आली लखनऊहून आणि नवी दिल्लीहून आली कात्री… सपाच्या कामचं श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे. आशा आहे की, आतापर्यंत एकटं बसून लखनऊवाल्यांनी समाजवादी पूर्वांचल एक्सप्रेस -वेच्या लांबीचा आकडा घोकून पाठ केला असेल. सपा बहुरंगी पुष्पवर्षावाने याचे उद्घाटन करून एकरंगी विचारधारा असणाऱ्यांना प्रत्यूत्तर देईल’, असे अखिलेश यादव यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.”

Related Stories

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात ‘पाणीयुद्ध’

Patil_p

स्थितीनुसार पाठिंब्याचा निर्णय- चौधरी

Patil_p

७० हजार एसटी कर्मचारी कामावर रुजू

Archana Banage

विकास साधत कार्यकाळ पूर्ण करणार!

Patil_p

लवकरच इंफाळपर्यंत धावणार रेल्वे : पंतप्रधान मोदी

Patil_p

ए. के. अँटोनी घेणार राजकीय संन्यास

Patil_p
error: Content is protected !!