Tarun Bharat

मोदींच्या हत्येचा कट; NIA च्या मुंबई कार्यालयात निनावी ईमेल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबई शाखेला यासंदर्भात एक ईमेल प्राप्त झाला आहे. यामध्ये पीएम मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलमध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीकडे 20 किलो आरडीएक्स असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

ईमेलमध्ये म्हटले आहे की, नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांचे 20 गट सक्रिय आहेत. आरडीएक्सच्या सहाय्याने स्फोट घडवून मोंदींना घातपात करण्यात येईल, असेही या मेलमध्ये म्हटले आहे. ई-मेलमध्ये म्हटल्याप्रमाणे हल्ल्याची संपूर्ण योजना तयार झाली आहे. आपली ओळख उघड होऊन हा कट फसू नये, यासाठी ई-मेल केल्यानंतर आपण आत्महत्या करणार असल्याचेही संबंधित व्यक्तीने सांगितले आहे.

दरम्यान, या ईमेलनंतर सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. हा ईमेल कुठून आला आणि ईमेल पाठवणारी व्यक्ती कोण होती, याचा तपास सुरू आहे.

Related Stories

‘नागालँडसारख्या पंजाबमध्येही हत्येच्या घटना घडणार’: फारूक अब्दुल्ला

Archana Banage

प्रयागराज हिंसाचारातील सूत्रधाराचे घर जमीनदोस्त

Patil_p

“कायदा सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी”

Archana Banage

‘स्लोवेनिया’ : युरोपातील पहिला कोरोनामुक्त देश

datta jadhav

भारताला अमेरिकेकडून लस निर्मितीचा कच्चा माल मिळेना

datta jadhav

शिराळा तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण

Archana Banage