Tarun Bharat

मोदींनी दिला दिवा पेटविण्याचा संदेश; अन् लोकांच्या पदरी निराशा : नवाब मलिक

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 

कोरोनाच्या संकटामुळे करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांच्या घरात चूल पेटत नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केले. त्यावेळी ते लोकांची चूल कशी पेटेल या संदर्भात बोलतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ते देशवासियांना घरात दिवा पेटविण्याचा संदेश देऊन गेले आणि देशवासियांच्या पदरी पुन्हा निराशाच आली, अशी खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.    

  आज सकाळी 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी मोदींवर जोरदार टीका केली. मलिक म्हणाले, मोदींनी लोकांची चूल पेटण्यासंदर्भात बोलतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी घरात दिवा लावायचा संदेश दिल्याने  देशवासियांच्या पदरात पुन्हा एकदा निराशा पडली.

Related Stories

कोरोना : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 11,813 नव्या रुग्णांची नोंद; 413 मृत्यू

Tousif Mujawar

अदर पूनावाला धमकी प्रकरणावर संजय राऊत म्हणाले…

Archana Banage

“संजय राऊत यांची मानसिकता निकृष्ट बनलीय”: चित्रा वाघ यांची टीका

Abhijeet Khandekar

आरोग्यमंत्र्यांकडून हॉटस्पॉट जळगावचा आढावा; उपाययोजनांबाबत सूचना

datta jadhav

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची तत्काळ हकालपट्टी करा -किरीट सोमय्या

Archana Banage

राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा लांबणीवर

prashant_c
error: Content is protected !!