Tarun Bharat

मोदींसह आयुष्मान, बिल्कीस दादी प्रभावशाली

Advertisements

टाईम मॅगेझीनकडून प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर :  जिनपिंग, डोनाल्ड ट्रम्प, कमला हॅरिस, जो बिडेन यांचाही समावेश

नवी दिल्ली : जगातील सर्वात प्रतिष्ठित मासिकांपैकी एक असलेल्या ‘टाईम’ने 2020 मधील सर्वात प्रभावी व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. जगातील सर्वात प्रभावी नेत्यांमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्थान मिळवले आहे. तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोध करण्यासाठी शाहीन बागमध्ये झालेल्या आंदोलनात सक्रियपणे वावरणाऱया बिल्कीस दादीसह बॉलिवूड अभिनेते आयुष्मान खुराणा, एचआयव्हीवर संशोधन करण्यात मोलाची भूमिका बजावणारे प्रा. रविंद्र गुप्ता व भारतीय वंशाचे सुंदर पिचाईंचा समावेश आहे.

टाईम मॅगझीनने 2020 च्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. दरवषी टाईम मॅगझीनकडून ही यादी जारी करण्यात येते. या यादीत जगभरातील निरनिराळय़ा क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला जातो. टाईम मॅगझीनच्या यादीत जगातील निरनिराळय़ा क्षेत्रातील 100 प्रभावशाली व्यक्तींना स्थान देण्यात येते. दरवषी ही यादी जाहीर केली जाते.

यंदाच्या यादीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांना स्थान देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन, कमला हॅरिस, जो बिडेन, जर्मन चान्सलर एन्जेला मार्केल यासारख्या अनेक नेत्यांचा समावेश आहे.

‘सीएए’विरोधी आंदोलनातील चेहरा

सीएएला विरोध करणाऱया शाहीनबागच्या आजी (दादी) म्हणजेच बिल्कीस यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. सीएएच्या विरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे करण्यात आलेल्या आंदोलनात 82 वषीय बिल्कीस यादेखील आंदोलक म्हणून सहभागी झाल्या होत्या. कोणी गोळी चालवली तरी एक इंचही मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

आयुष्मान : एकमेवाद्वितीय अभिनेता

अभिनेते आयुष्मान खुराणा या भारतीय अभिनेत्यालाही टाईमच्या यादीत स्थान मिळाले आहे. चित्रपट जगतात त्यांची गणना सर्वात हुशार अभिनेत्यांमध्ये होते. 2012 मध्ये त्यांनी विकी डोनर या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली होती. त्यानंतर ते सतत हिट चित्रपट देत आहेत. अंधाधुन, आर्टिकल 15, बाला आणि ड्रीम गर्ल हे त्यांचे चित्रपटही बहुचर्चित ठरले आहेत. ‘टाईम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सामील झाल्याने मला अभिमान वाटतो.’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

एचआयव्हीवरील
संशोधनाला ‘ताज’ विशेष म्हणजे या यादीमध्ये भारतीय प्राध्यापक रविंद्र गुप्ता यांचाही समावेश करण्यात आला आहे. अन्य सर्वांची नावे तशी परिचयाची असली तरी गुप्ता यांचे नाव अनेकांसाठी नवीन ठरले. प्राध्यापक गुप्ता हे त्यांनी एचआयव्हीवर (एड्स) केलेल्या संशोधनासाठी ओळखले जातात. गुप्ता यांनी ‘फंक्शनल एचआयव्ही क्मयुअर’ पद्धतीने उपचार करून एचआयव्हीग्रस्तांना जीवदान दिले आहे.

Related Stories

स्वातंत्र्याचा अमृतकाल : विकसीत भारताचा संकल्प

Amit Kulkarni

शैक्षणिक क्रांतीसाठी ‘नवा डाव’

Patil_p

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 जानेवारीपर्यंत बंदच

Amit Kulkarni

आफ्रिकन व्हेरिएंटपासून भारत सुरक्षित

Patil_p

संजदचे राजदमधील विलीनीकरण लवकरच!

Patil_p

प्रख्यात पत्रकार कमाल खान यांचे निधन

Patil_p
error: Content is protected !!