मुंबई \ ऑनलाईन टीम
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली ही अतिशय चांगली बाब असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच उटसूट केंद्राकडे बोटं दाखवण्याची प्रथा चांगली नाही, असा टोला देखील लगावला.
देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या प्रश्नांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली ही अतिशय चांगली बाब आहे. आम्ही कायम सांगत आलो आहोत की, पंतप्रधान महाराष्ट्राबद्दल कायमच सकारात्मक असतात. राज्य आणि केंद्रानं आपापसातील संबंध चांगले ठेवले तर याचा फायदा राज्यालाच होतो. उटसूट केंद्राकडे बोटं दाखवण्याची प्रथा चांगली नाही, असे देखील ते यावेळी म्हणाले.
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमधील बैठक जवळपास पावणे दोन तास चालली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, मागासवर्गीय आरक्षण, पीक विम्याचा बीड पॅटर्न, कांजूरमार्ग कारशेड मंजुरी , तोक्ते चक्रीवादळ, १४ व्या वित्त आयोगातील निधी, मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा मिळावा, या विषयांवर बैठकीत चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांना आज माध्यमांशी बोलताना सांगितले.

