Tarun Bharat

मोदी नसते तर भारताची अवस्था अफगाणिस्तानसारखी झाली असती- कंगना राणावत


Advertisements


मुंबई \ ऑनलाईन टीम

अफगाणिस्तान देशाला तालिबान्यांनी पुर्णपणे ताब्यात घेतलं आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी देश सोडून गेले आहेत. त्यामुळे तेथील परिस्थिती चिघळली आहे. अफगाणिस्तानमधील नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडून जाताना दिसत आहेत. या सगळ्या परस्थितीवर नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने फेसबुकवर काही व्हिडिओ आणि काही फोटो शेअर करत अफगाणिस्तान आणि तालिबान संघर्षावर मत व्यक्त केले आहे.

पाकिस्तान देश तालिबान्यांचं पालनपोषण करतो आणि तर अमेरिका त्यांना शस्त्रं पुरवतो. जर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर भारताचीही अवस्था आजच्या अफगाणिस्तानासारखीच झाली असती, असं कंगणा राणावतने म्हटलं आहे. यासंदर्भात तिने फेसबुक पोस्ट केली आहे.

कंगनाने एका ब्रेकींग न्यूजचा फोटो शेअर केला आहे. आज आपण मुकाटपणे हे पाहत आहोत, उद्या हे आपल्यासोबतही घडू शकते, असे कंगनाने म्हटले आहे. तसेच, भारत सरकार अफगाणिस्तानमधील भारतीयांना देशात परत आणत आहे, त्यावरही कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे. चांगलं झालं मी सीएएच्या समर्थनार्थ लढाई लढली. मी संपूर्ण जगाला वाचवू इच्छिते, पण त्यासाठी सुरुवात माझ्या घरापासून करायला हवी. मी आपल्या सरकारचे आभार मानते की, त्यांनी सीएए कायदा आणला आणि एक आशावाद दाखवला. सर्वच हिंदू, शीख, जैन, इसाई, बुद्धिस्ट, पारसी आणि शेजारील इस्लामिक देशांतील इतर धर्मीय नागरिकांना राहण्यासाठी जागा मिळेल, असा आशावाद निर्माण केला. मी अफगाणिस्तानसाठी प्रार्थना करते, असे कंगनाने म्हटले आहे.

Related Stories

नॅचरल गॅसच्या किंमतीत 62 टक्क्यांची वाढ

datta jadhav

5 राज्यांच्या निवडणुकीपूर्वी ओबीसींना गिफ्ट

Patil_p

अमेरिकेला शक्तिशाली चक्रीवादळाचा धोका

Patil_p

अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी

Archana Banage

हंडाभर पाण्यासाठी आखाडेवस्तीकरांची वणवण

Patil_p

उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांच्या बदल्या

Patil_p
error: Content is protected !!