Tarun Bharat

मोदी पुन्हा ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. 71 टक्के रेटिंगसह आवडत्या नेत्यांच्या यादीत मोदींचे नाव अव्वल स्थानावर आहे. अमेरिकतील ग्लोबल लीडर अप्रुव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केलं आहे.

मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जाहीर केलेल्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सहाव्या क्रमांकावर आहेत, त्यांचे रेटिंग 43 टक्के आहे. बायडेन यांच्यानंतर कॅनडाचे अध्यक्ष जस्टिन ट्रुडो यांनाही 43 टक्के रेटिंग मिळाले आहे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना 41 टक्के रेटिंग मिळाले आहे. मॉर्निंग कन्सल्टने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की, 13 ते 19 जानेवारी 2022 दरम्यान गोळा केलेल्या डेटाच्या आधारे न्यूनतम मंजूर रेटिंग निश्चित केले गेले आहे. हे रेटिंग प्रत्येक देशातील प्रौढ नागरिकांच्या सात दिवसांच्या सरासरी सर्वेक्षणावर आधारित आहे. सर्वेक्षण केलेल्या लोकांची संख्या प्रत्येक देशानुसार बदलते.

दरम्यान, नोव्हेंबर 2021 मध्येही पंतप्रधान मोदी यांनी जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले होते. मे 2020 मध्येही याच वेबसाइटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च रेटिंग दिलं. त्यावेळी त्यांना 84 टक्के रेटिंग देण्यात आले होते, जे मे 2021 मध्ये 63 टक्क्यांपर्यंत खाली आले होते.

Related Stories

अलमट्टी धरण 95 टक्के भरले, 72 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु, कोल्हापूर जिल्ह्यात 58 बंधारे पाण्याखाली

Abhijeet Khandekar

सुशांत आत्महत्या : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण; निकाल ठेवला राखून

Tousif Mujawar

मल्लिकार्जुन खर्गे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते

Patil_p

शहरातून गावात पाठविल्या जाणाऱया रकमेत घट

Patil_p

“सरसकट होलसेलमध्ये ‘वाय’ सुरक्षा पुरविण्याची मोदी सरकारवर वेळ …”

Abhijeet Khandekar

काँग्रेसचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याच्या आदेशाला स्थगिती… भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल सुरूच राहणार

Archana Banage