ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना देशभरातून विरोध होत आहे. आता याच मुद्द्यावरून भाजपला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील २२ वर्षांपासूनचा मित्र अकाली दलाने मंत्रिमंडळाबरोबरच एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीच शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी कृषी कायद्याच्या विरोधात आपल्या कॅबिनेट मंत्रिमपदाचा राजीनामा दिला होता. तर आता अकाली दलाने थेट एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
आज शिरोमणी अकाली दलाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये अकाली दलाने एनडीएतून बाहेर बडण्याचा निर्णय घेतला. अकाली दलाने आपल्या फेसबुक पेजवर कोअर कमेटीची बैठक लाईव्ह घेऊन या निर्णयाची घोषणा केली आहे.


previous post
next post