Tarun Bharat

मोदी सरकार 2024 पर्यंत सत्तेत राहणार नाही

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  

कोरोना संकट रोखण्यात आलेले अपयश, वाढती महागाई आणि बेरोजगारी यामुळे देशातील जनता मोदी सरकारवर नाराज आहे. परिणामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच हे सरकार कोसळेल आणि देशात मध्यावधी निवडणुका लागतील, असे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी म्हटले आहे. चौटाला हे  
इंडियन नॅशनल लोकदलचे प्रमुख आहेत.  

चौटाला म्हणाले, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई गगणाला भिडली आहे. बेरोजगारी आहेच. तसेच कोरोना संकट हाताळताना आलेले अपयश यामुळे देशातील जनता दु:खी आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकार पडेल आणि देशात मध्यावधी निवडणुक लागेल. हरियाणात सध्या सत्तेवर असलेले भाजपा-जजपा सरकारही 2024 पर्यंत सत्तेत टिकणार नाही. ही आघाडी पूर्णपणे कमकुवत झाली आहे.  

Related Stories

गेल्या 24 तासांत देशात 30,773 कोरोनाबाधित

Patil_p

देशात कोरोनाबाधितांची संख्या 70 हजारांवर

datta jadhav

वाहतूक कोंडी झाल्यास भरावा लागणार नाही टोल?

Patil_p

पंजाबच्या 10 नवीन मंत्र्यांनी घेतली शपथ

datta jadhav

सनरूफ असणारी ऑटोरिक्षा

Patil_p

मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती

Amit Kulkarni