Tarun Bharat

मोनोरेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफीसर डॉ. डी. एल. एन. मूर्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल

ऑनलाईन टीम / मुंबई :


थकीत बिल मंजूर करण्यासाठी २० लाख रुपये लाच मागणारे मुंबई मोनोरेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफीसर डॉ. डी. एल. एन. मूर्ती यांच्याविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. हाऊस किपिंगसह विविध कामाचे बिल मंजूर करण्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागितली होती. फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीच्या तक्रारीवरुन एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी फॅसीलीटी मॅनेजमेंटची कंपनी असून, नमुद कंपनीला मुंबई मोनोेरेल या प्रकल्पाअंतर्गत साफसफाई, हाउसकिपींग, मेंटनन्स, कस्टमर सर्व्हिस असोशीएट संबंधाने, जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२० पर्यंतचे कंत्राट मिळालेले होते, सदरचे काम त्यांनी ऑगस्ट २०२० रोजी कंत्राटाप्रमाणे पुर्ण केले असून, नमुद कामाचे देयक (बिल/पेमेंट) दोन कोटी पन्नास लाख आणि ३२ लाख बॅक गॅरंटी असे कंपनीस मिळणे प्रलंबित होते, वारंवार प्रयत्न करून फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये त्यांचे कंपनीस रूपये २ कोटी १० लाख आणि जुन २०२१ मध्ये २२ लाख बॅक गॅरंटीची रक्कम असे मुंबई मोनोरेलतर्फे अदा करण्यात आली होती. परंतु अदयाप ४० लाख रूपये आणि११ लाख बॅक गॅरन्टीची रक्कम मुंबई मोनोरेलकडे प्रलंबित आहेत.

फिर्यादी फॅसीलीटी मॅनेजमेंटची कंपनी असून, नमुद कंपनीला मुंबई मोनोरेलया प्रकल्पाअंतर्गत साफसफाई, हाउसकिपींग, मेंटनन्स, कस्टमर सर्व्हिस असोशीएट संबंधाने, जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२० पर्यंतचे कंत्राट मिळालेले होते, सदरचे काम त्यांनी ऑगस्ट २०२० रोजी कंत्राटाप्रमाणे पुर्ण केले असून, नमुद कामाचे देयक (बिल/पेमेंट) दोन कोटी पन्नास लाख आणि ३२ लाख बॅक गॅरंटी असे कंपनीस मिळणे प्रलंबित होते, वारंवार प्रयत्न करून फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये त्यांचे कंपनीस रूपये २ कोटी १० लाख आणि जुन २०२१ मध्ये २२ लाख बॅक गॅरंटीची रक्कम असे तर्फे अदा करण्यात आली होती. परंतु अदयाप ४० लाख रूपये आणि११ लाख बॅक गॅरन्टीची रक्कम  मुंबई मोनोरेलकडे प्रलंबित आहेत.


दरम्यान, उर्वरित बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी मुंबई मोनोरेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफीसर डॉ. डी. एन. मूर्ती यांनी २० लाख रुपयांची लाट मागितली. त्यामुळे एसीबीने मुर्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

राज ठाकरे कोरोनामुक्त

datta jadhav

खो-खो चा महान कार्यकर्ता हरपला, रमेश वरळीकर यांचे देहावसान!

Tousif Mujawar

बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन; थोरतांच्या टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

महाराष्ट्रात 3390 नवे कोरोना रुग्ण; तर 1632 रुग्णांना डिस्चार्ज

Tousif Mujawar

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व यंत्रणा सज्ज

datta jadhav

अंबरनाथ : एमआयडीसीमधील बिस्कीट कंपनीला भीषण आग

Tousif Mujawar