Tarun Bharat

मोपा तुळसकरवाडी ते मोपा विमानतळ प्रकल्प रस्त्याला ग्रामस्थांचा कडाडून विरोध

Advertisements

एरोसिटी प्रकल्पालाही विरोध, नुकसानभरपाई त्वरित द्या, वारखंड-नागझर  खास ग्रामसभेत ठराव मंजूर

प्रतिनिधी / पेडणे

धारगळ सुकेकुळण ते नागझर तुळसकरवाडी मोपा विमानतळ प्रकल्पाकडे जाणाऱया रस्त्याला पूर्ण विरोध केला जाईल, वारखंड पंचायत क्षेत्रातील नागझर ते तुळसकरवाडी मोपा प्रकल्पाकडे जाणाऱया रस्त्याला प्राणपणाने लढा देणार असा इशारा देत  रस्ता  करताना आमची झाडे आणि घरावर, बुलडोझर घालण्यापूर्वी सरकारने आमच्या देहावर बुलडोझर घालावेत आणि आमचे जीव घ्यावेत .कोणत्याही स्थितीत आम्ही रस्ता करू देणार नाही , शिवाय एरोसिटी प्रकल्पाला विरोध आहे , तो प्रकल्प रद्द करून विमानतळासाठी घेतलेल्या जमितच 20 ते तीस लाख चौरस मीटर जागेत  हा  प्रकल्प करावा , अतिरिक्त जमीन परत करावी आणि जी झाडे कापली त्यांची त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशा  प्रकारचे ठराव वारखंड नागझर  पंचायतीच्या  खास ग्रामसभा रविवारी  24 रोजी तुळसकरवाडी मोपा येथे आयोजित  केलेल्या सभेत घेण्यात आले. यावेळी  उपस्थित सर्व ग्रामस्था?नी हात उंचावून या प्रकल्पाला विरोध दर्शवला .

धारगळ ते तुळसकर वाडी मोपा प्रकल्पापर्यंत रस्ता झाला तर आमची घरे ,काजू बागायती व पाण्याचे स्रोत नस्ट होतील . याचे गांभीर्य ओळखून आता पंचायत मंडळाने आणि सरकारने  ,तुळसकर वाडी येथील सर्व जागा वाचवण्याची गरज आहे . ,काजू बागायती वर जीवन अवलंबुन आहे . ईरोसिटीक प्रल्पासाठी जी जागा घेतली ती वगळा, या प्रकल्पात जनहित नाही .असा ग्रामस्था?नी दाव? करून आता पर्यंत झालेली, नुकसान भरपाई त्वरित द्या.

शेती, काजू बागायती हेच एकमेव जगण्याचे साधन आहे, आम्हाला सरकारी नोकर्या नको किंवा जास्थ पैसा नको, आमच्या जमिनी आम्हाला परत द्या त्या रस्त्यासाठी अतिरिक्त घ्यायला देणार नाही असा इशारा ग्रामस्थानी दिला आहे

अन्यथा आत्महत्या करणार : श्यामसुंदर मयेकर

शेती बागायती हेच आमच्या आर्थिक उत्पन्नाचे  साधन आहे. घरात कुणी कमावता नाही , आपल्याकडे काम होत नाही , मुलगा बेरोजगार आहे ,आणि एकमेव उत्पन्नाचे साधन जर सरकार रस्त्यासाठी घेवू पाहत आहे तर दुसरा  जीवन जगण्यासाठी आधार नाही .त्यामुळे मला आता आत्महत्या करावी लागेल असा इशारा श्यामसुंदर मयेकर यांनी भर ग्रामसभेत दिला .

तुळस्करवाडीतून रस्ताच नको

रमाकांत तुळसकर यांनी बोलताना रस्ता करताना आम्हाला विश्वासात  न घेता रस्ता करू नये ,अधिकाराचा वापर करू नये अशी मागणी केली .कोरोना महामारीतून आता आम्ही शेतीवर अवलंबून आहे , महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतो ही स्थिती जर या भागात आली तर ही पूर्ण जबाबदारी पंचायत व सरकारची असेल असा इशारा नारायण तुळसकर यांनी दिली .आग लावून बागायती जाळण्याचा प्रकार केला जातो तो प्रकार थांबवा अशी मागणी ग्रामस्थानी केली .

सरपंच संजय तुळसकर यांनी माहिती देताना आम्ही ग्रामस्थासोबत असणार  जे ग्रामसभेत ठराव घेतले जाईल ते सरकार दरबारी  पोचवले जाईल .असे स्पष्टीकरण संजय तुळसकर यानी केले .

सरकारने हुकूमशाहीने जर रस्ताच केला तर आमच्या पोटावर बुलडोझर घाला . आम्ही आमच्या  जमिनी देणार नाही सर्व महिला रस्त्यावर येणार ,असा इशारा नारायण तुळसकर यांनी दिला .

आमच्या मुलांना या जमीनीचा आधार लोकप्रतिनिधी  केवळ मतासाठी येतात ,आता ते कुठे गेले असा सवाल ग्रामस्था?नी  ग्रामसभेत केला .

जमिनीत रस्ता नको ,केला तर बुलडोझर अडवला जाईल .

विमानतळ किती चौरस मीटर जागेत बांधला जातो तो कुण्यासाठी नागरिकांचा सत्यानाश सरकार  करतो ,रस्त्यासाठी सर्व्ह? करताना महिलांनी त्यांना रोखले त्यावेळी पंच का आले नाही मदतीला असा सवाल  बाबलो कांबळी यांनी केला .पीडियेचा अर्थ काय हेही सांगावे . 6  पंचायतींना  पीडीये   लावली जाते ,ती लावली तर कुणालाच घर बांधताना येत नाही . जमनीत रस्ता केला तर आमच्यावर बुलडोझर घालावा लागेल .

तीळारीचे पाणी शेतीसाठी असताना ते विमानतळासाठी कसे  वापरले  जाते असा सवाल केला. मोपा विमानतळ परिसरात दोन घरे गरिबांची मोडली आणि त्यांना अपंग केले ,ती घरे बेकायदेशीर नव्हती , जर घरे बेकायदेशीर आहेत तर सरकार बेकायदेशीर आहेत असा दावा केला. राज्यात दोन विमानतळाची गरज नाही ,अतिरीक्त जमीन परत करा .अशी जोरदार मागणी ग्रामस्था?नी केली

एरोसिटी म्हणजे काय ?

एरोसिटी म्हणजे काय याचे उत्तर सरपंच संजय तुळसकर यांना ग्रामस्थानी विचारले असता सरापंच संजय तुळसकर हे समर्पक उत्तरे देऊ शकले नाही .

पर्यावरणाची हानी करून विकास नको प्राणी ,पशु जगले पाहिजे त्याचा समतोल पर्यावरणाशी निगडित असतो . असे नारायण तुळसकर यांनी सांगून कोणत्याही दबावाला बळी पडू नका असे आवाहन केले .

संदीप कांबळी यांनी बोलताना जर  ग्रामस्थाना रस्ताच व एरोसिटी नको  तर पंचायतीची भूमिका काय असेल ? असा सवाल केला असता सरपंच संजय तुळसकर यांनी ग्वाही देताना आम्ही सरकार मार्फत हे विषय सोडवणार सरकारलाही गावात आणणार व पंचायत ग्रामस्थासोबत असणार .या पुढे पंचायत  ग्रामस्था?ना सोबत घेऊनच प्रश्न सोडवणार .

मोपा विमानतळ करताना रस्त्यांचे पूर्वी नियोजन असतील  तर मग आता अतिरिक्त रस्ते कशासाठी असा सवाल संदीप कांबळी यांनी केला .

एरोसिटी म्हणजे त्या जागेत हॉटेल ,मोल इतर प्रकल्प येणार त्यात सर्वांसाठी प्रवेश खुला असेल मात्र पुढील विमानतळ जागेत जाण्यासाठी  निर्बध घातले जाईल अशी भीती खुद्द सरपंच संजय तुळसकर यांनी व्यक्त केली

ठराव मंजूर

वारखंड नागझर पंचायत क्षेत्रातून तुळसकर वाडी   मोपा प्रकल्पाकडे जाणाऱया रस्त्याला विरोध हा ठराव मांडला .

एरोसिटी नकोच शिवाय ती जमीन शेतकऱयांना परत करावी , शिवाय ज्यांची नुकसानी झाले ती त्वरित द्यावी  अशे तीन ठरावं मंजूर करण्यात आले .

यापुढे प्रत्येक प्रभागात एखादा विषय गंभीर झाला तर खास ग्रामसभा त्या त्या प्रभागात आयोजित करण्यात यावी अशी ग्रामस्था?नी सूचना केली त्याच वेळी  सरपंच तुळसकर यांनी ही नांदी असून या पुढे तश्या ग्रामसभा किंवा खास ग्रामसभा  घेण्यात येईल

राजकारण बाजूला ठेवूया

सरपंच संजय तुळसकर यांनी यावेळी ग्रामास्थाना  आवाहन करताना  या विषयावर राजकारण करू नये संघटित होऊन हा लढा देण्याचा निर्धार केला . सुरूवातीला सरपंच संजय तुळसकर यांनी सर्वांचे स्वागत केले.

Related Stories

पर्यटकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

Amit Kulkarni

व्हीपीकेची आर्थिक स्थिती भक्कम

Omkar B

राज्यातील कायदा व्यवस्था ढासाळली

Patil_p

कुडणे महालक्ष्मी कलश बैठक मंदिर अध्यक्षपदी राजेंद्र मायणीकर

Patil_p

वीजमंत्री काब्रालांची संपत्ती नऊ लाखांवरुन तीन कोटींवर

Amit Kulkarni

शेळ मेळावलीप्रकरणी मंत्री गोविंद गावडे यांनी भूमिका स्पष्ट करावी

Patil_p
error: Content is protected !!