Tarun Bharat

मोपा लिंकरोडसाठी झाडांची कत्तल जोरात

सरकारी अधिकाऱयांसह ठेकेदाराची दादागिरी

प्रतिनिधी /पेडणे

मोपा लिंकरोड शेतकऱयांच्या आंदोलनाला झिडकारून झाडे कापण्याचे काम जोमात सुरू आहे. सरकारी अधिकारी आणि ठेकेदाराची दादागिरी सुरुच असून सरकारी यंत्रणेच्या बळाचा वापर करून झाडे कापून ती जमिनीत गाडली जात आहेत.

मोपा लिंकरोड पीडित शेतकऱयांनी रविवारी नागझर येथे रस्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर 24 तासाची मुदत शेतकऱयांनी प्रशासनाला दिली होती. याचाच फायदा घेऊन तेथील यंत्रणेने काम वेगाने सुरू केले. जास्ती जास्त यंत्रे लावून जागा सपाटीकरणाचे काम सुरू आहे. सरकारी अधिकारी आणि पोलीस बळाचा वापर करून शेतकऱयांच्या मनात भीती निर्माण केली.

 तासांची मुदत संपूनही शेतकऱयांना अजून न्याय मिळालेला नाही. मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने शेतकऱयांनी अडथळा आणण्यास टाळले. असेच बेधुंदपणे काम सुरू राहिले तर महिन्याचे काम आठ दिवसांत पूर्ण होण्याची शक्मयता आहे. शेतकरी आपल्या शेतजमिनीच्या हद्दीवर उभे राहून हतबलपणे पाहण्या पालिकडे काहीच करू शकले नाही, पोलीस फौज ठिकठिकाणी तैनात केली होती.

तुळसकरवाडी येथे सुरू असलेल्या लिंकरोडच्या कामादरम्यान शेतकऱयांची काजू बागायती तसेच माड, पोफळी यांची नासधूस करण्यात आली. शेतकऱयांच्या डोळय़ा देखत फळे लागलेली काजू झाडे कापून बुलडोझरने खाली गाडण्याचे काम वेगात सुरू होते. अनेक वर्षे घाम गाळून उभी केलेली बागायती काही तांसातच जमीनदोस्त केली. यामुळे पीडित शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडले आहेत.

मामलेदार, पोलीस निरीक्षक, सर्व मोठय़ा पदावरचे प्रशासकीय कर्मचारी शेतकरी अडथळा आणतील म्हणून घटनास्थळी उपस्थित होते. ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात पोलिस फाटा कार्यरत होते. शेतकरी निराशा त्यांच्या चेहऱयावरून व्यक्त करत होते. येणाऱया काळात वारखंड- नागझर, तुळसकरवाडी या भागातील ग्रामस्थांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. कार्यरत असलेले नैसर्गिक झरे देखील या कामादरम्यान बुजवण्यात आले. निसर्गाची मोठय़ा प्रमाणात होत असलेली हानी होत असल्याचे चित्र आहे. आता मोपा पंचक्रोशी पीडित जन संघटना कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान धीर देणारे उमेदवार गायब

 विधानसभा निवडणुकीत काही उमेदवार वगळता बाकीचे फिरकलेच नाही. आंदोलनकर्ते पीडित शेतकरी आपल्या शेतजमिनी वाचविण्यासाठी आर्त हाक देत असताना केवळ काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र गावकर, मांदे मतदारसंघाचे आपचे उमेदवार प्रसाद शहापूरकर व पेडणे मतदारसंघाचे आपचे उमेदवार पुंडालिक धारगळकर हे तीनच उमेदवार आंदोलनकर्त्यासोबत होते. बाकीच्या उमेदवार आंदोलन स्थळी फिरकलेच नाही.

 स्वाभिमानी पेडणेकर लपले कुठे ?

निवडणुकीच्या रणधुमाळीत आम्ही पेडणेकर स्वाभिमानी आहोत. एक होऊया असे सांगणारे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनीही या आंदोलनाकडे पाठ फिरविली. पेडणेच्या हिताच्या बाता मारणाऱयांनी साधी आंदोलनकर्त्यांची भेटही घेण्याचे सौजन्यही दाखविले नाही. यावरुन पेडणेच्या जनतेबाबत त्यांना किती कळवळा आहे हे दिसून येत आहे. त्यांच्याबाबत शेतकऱयांनी तीव्र नाराजी व्यक्त करून स्वाभिमानी पेडणेकर म्हणवणारे कार्यकर्ते लपले कुठे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 वनखाते अस्तित्वात आहे की नाही? : भरत बागकर

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच पर्यावरण टिकविण्यासाठी सरकारचे वनखाते काम करते. मात्र मोपा या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम करताना सर्वनियम आणि कायद्याचे उल्लंघन करत हे काम सुरु आहे.सरृकारचे वनखाते अस्तित्वात आहे चाय या प्रकाराकडे त्यांनी लक्ष दिले असते मात्र ते अस्तित्वात नाही त्यामुळेच अशा बेसुमार कुठलेही परवाने न घेता झाडांची कत्तल केली जात असल्याचे मोपा पंक्रोशी पिडीत जन आंदोलन समितीचे अध्यक्ष भरत भागकर यांनी सांगितले. शेतकरी आपली झाडे वाचविण्याची विनंती करतात त्यावेळी हे अधिकारी बघ्याची भूमिका घेत तेथून पळतात असे भरत बागकर म्हणाले.

 कंपनीचा झाडे लावण्याचा दावा खोटा !

समितीचे अध्यक्ष भरत बागकर म्हणाले, वनखात्याच्या नियमाप्रमाणे एक झाड कापले तर त्याच्या दहापट झाडे लावावी असा नियम आहे. मात्र या ठिकाणी हजारो झाडे कापून टाकली.याप्रकाराकडे वनखाते दुर्लक्ष करत असून वनखात्याचे अधिकारी यांचाही ही झाडे कापण्यासाठी पाठिंबा असून शेतकऱयांच्या तोंडाला त्यांनी पाने फुसली आहे आसा आरोप भरत बागकर यांनी केला.

Related Stories

दिंडी महोत्सव हे मडगावचे भूषण : कामत

Amit Kulkarni

विकास, रोजगारासाठी काँग्रेसला विजयी करा

Patil_p

कुंकळ्ळी बसस्थानकावर आवश्यक सुविधा उपलब्ध करणार

Amit Kulkarni

डिचोलीची वैशिष्टय़पूर्ण घोडेमोडणी साजरी.

Amit Kulkarni

मडगावच्या विकासाठी ‘भिवपाची गरज ना’

Omkar B

मडगावचे उद्योजक राजेश तिंबलो यांचे मुंबईत निधन

Amit Kulkarni