Tarun Bharat

मोफत दूध घेण्यासाठी धावपळ-गोंधळ

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत या उद्देशाने कर्नाटक दूध उत्पादक (केएमएफ) संघाकडून विविध भागात मोफत दूध वाटप करण्यात येत आहे. मात्र, यामध्ये योग्य नियोजन नसल्याने दूध घेण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ उडत आहे. यामुळे सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचनेलाच हरताळ फासण्यात येत आहे. दुधाची गाडी येताच दूध घेण्यासाठी नागरिक धावतच जात आहेत. यामुळे गोंधळ उडत आहे.

लॉकडाऊन कालावधीत केएमएफद्वारे घरोघरी जाऊन गोरगरिबांना दूध वाटप करण्यात यावे, अशी सूचना सरकारच्यावतीने करण्यात आली आहे. मात्र, दूध वाटपात योग्य नियोजन नसल्याने तसेच दूध घेणाऱया नागरिकांची संख्या वाढत चालल्याने एकूणच दूध वाटपाची ही योजना गोंधळाची ठरत आहे. सुरक्षित अंतर ठेवण्यात येत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचीही शक्यता आहे. सदर दूध झोपडपट्टी आणि गोरगरिबांनाच देण्याची सूचना करण्यात आली असली तरी सर्वसामान्य नागरिकही मोफत दूध घेण्यासाठी चढाओढ करत आहेत. भारतनगर, खासबाग, शहापूर, वडगाव भागात ठराविक वाहने करून दुधाचे वाटप सुरू आहे. मात्र, योग्य नियोजनाअभावी काही जण दोन-तीन पाकिटे दूध घेत आहेत. काहींच्या हाती काहीच लागत नसल्याने पुन्हा गाडी येण्याची वाट पाहत आहेत. यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. 

Related Stories

चॅपेल रोडवर खड्डय़ांचे साम्राज्य

Amit Kulkarni

हिंडलगा ग्रामविकास सुधारणा कमिटीची निवड

Omkar B

पहिले रेल्वेगेट परिसरात दुरुस्तीचे काम

Amit Kulkarni

आतापर्यंत 13 हजार जनावरांना लम्पिस्कीन प्रतिबंधक लस

Patil_p

सौंदत्ती यात्रेतून परिवहनला दीड कोटींचे उत्पन्न

Amit Kulkarni

पोटासाठी त्याची पायपीट सुरूच

Amit Kulkarni
error: Content is protected !!