Tarun Bharat

मोफत लसीकरण ही सरकारची जबाबदारी

लालूप्रसाद यादवांचे पंतप्रधान मोदींना आवाहन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बिहारचे माजी मुख्यमंत्री तसेच राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी लसीकरणासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोमवारी आवाहन केले आहे. तसेच केंद्र सरकारवर निशाणाही साधला आहे.  1996-97 मध्ये तत्कालीन जनता दलाच्या सरकारने पोलियो उर्न्मूलनासाठी चालविलेल्या लसीकरण मोहिमेची आठवण त्यांनी मोदींना करून दिली आहे.

1996-97 मध्ये समाजवाद्यांच्या देशात जनता दलाचे सरकार होते, तेव्हा पक्षाचा मी अध्यक्ष होतो. आमच्या सरकारने पोलियो लसीकरणाचा विश्वविक्रम केला होता. त्या काळात आतासारख्या सुविधा, जागरुकता नव्हती. तरीही 7 डिसेंबर 1996 रोजी 11.74 कोटी तर 18 जानेवारी 1997 रोजी 12.73 कोटी बालकांना पोलियोची लस देण्यात आली होती असे लालूंनी ट्विट करत म्हटले आहे.

त्या काळात लसीबद्दल लोकांमध्ये संशय आणि गोंधळ होता, पण संयुक्त आघाडी सरकारने पोलियोच्या उच्चाटनाचा दृढनिश्चय केला होता. पण आज तथाकथित विश्वगुरु सरकार स्वतःच्या नागरिकांना पैसे आकारूनही लस उपलब्ध करू शकत नसल्याचे पाहून दुःख होत असल्याचे लालूंनी नमूद पेले आहे.

या जीवघेण्या महामारीत लसीकरण कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्व देशवासीयांना मोफत लस देण्याची घोषणा करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींना करत आहे. राज्य आणि केंद्राची किंमत वेगवेगळी असू नये. प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळावी ही केंद्र सरकारची जबाबदारी असल्याचे लालूप्रसाद यांनी म्हटले आहे.

लालूप्रसाद यादव सध्या जामिनावर तुरुंगातून बाहेर पडले आहेत. नवी दिल्ली येथे राहत असलेल्या राज्यसभा खासदार आणि कन्या मीसा भारती यांच्या निवासस्थानी लालू वास्तव्य करत आहेत. लालूंनी रविवारी सुमारे साडेतीन वर्षांनी पक्षाच्या नेत्यांशी व्हर्च्युअल माध्यमातून संवाद साधला होता.

Related Stories

निर्भयाच्या गुन्हेगारांच्या याचिकेवर 14 रोजी सुनावणी

Patil_p

पंजाबमध्ये मागील 24 तासात 5,371 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

कोरोना सामग्रीसंबंधी आज जीएसटी मंडळाची बैठक

Patil_p

बिहारमध्ये दारूकांडानंतर वरिष्ठ पोलिसांच्या बदल्या

Patil_p

‘मेटा’चे भारतातील प्रमुख अजित मोहन यांचा राजीनामा

Amit Kulkarni

बाब रामदेव म्हणतायंत मी लवकरच कोरोना लस घेणार

Archana Banage