सद्यकाळात लोक स्वतःच्या स्मार्टफोनमध्ये गुंतलेले असल्याने कुठल्याही गोष्टीला धडकत असतात. लोक रस्त्यावर असो किंवा घरात स्वतःचा फोन पाहतच चालतात, यामुळे अनेकदा दुर्घटना होत असते. याचमुळे अशा दुर्घटनांपासून वाचण्यासाठी एका व्यक्तीने ‘तिसरा डोळा’च तयार केला आहे.
दक्षिण कोरियाचा 28 वर्षीय डिझायनर पेंग मिन-वूकने एक रोबोटिक नेत्र तयार केला असून तो डोक्यावर लावताच कुठलाही व्यक्ती स्क्रीन पाहत देखील रस्त्यांवर चालू शकतो. रोबोटिक नेत्र कुणाच्याही माथ्यावर बांधला जाऊ शकतो आणि तो समोर न पाहता देखील सुरक्षितपणे चालू शकतो.


गॅझेटचे व्यसन गांभीर्याने ओळखून स्वतःला त्यापासून मुक्तता मिळवून देण्याचा प्रयत्न लोकांनी करावा म्हणून या उपकरणाची निर्मिती केल्याचे पेंग सांगतो. या उपकरणाचे नाव ‘थर्ड आय’ ठेवण्यात आले आहे. वापरकत्याचे डोकं खाली पाहण्यासाठी झुकलेले असताना हा तिसरा नेत्र स्वतःच्या पापण्या उघडतो. जेव्हा एखादा व्यक्ती कुठल्याही अडथळय़ाच्या एक किंवा दोन मीटर नजीक असताना थर्ड आय बीपद्वारे त्याला धोक्याची जाणीव करून देत असल्याचे पेंग यांनी म्हटले आहे.
स्मार्टफोनवरून आमचे डोळे हटवू शकत नसल्याने भविष्यात आम्हाला अतिरिक्त डोळय़ाची आवश्यकता भासणार आहे. रॉयल कॉलेज ऑफ आर्ट आण इम्पीरियल कॉलेज लंडनमध्ये तंत्रज्ञान डिझाइनचे शिक्षण घेणाऱया वूकने सोल शहरात उपकरणाचे परीक्षण केले आहे.