Tarun Bharat

मोबाईल वॉलेटवरून वीजबिल भरण्याची सेवा पूर्ववत

प्रतिनिधी / बेळगाव

मोबाईल वॉलेटमधून विजेचे बिल भरणाऱया ग्राहकांना मागील दोन महिन्यांपासून अनेक समस्या येत होत्या. यामुळे ग्राहकांमधून ही सेवा पूर्ववत करण्याची मागणी होत होती. अखेर हेस्कॉमने फोन पे, ऍमेझॉन पे, गुगल पे, मोबी क्विक, फ्री चार्ज यासारख्या मोबाईल वॉलेटमधून बिल भरण्याची सेवा पूर्ववत होणार असल्याचे जाहीर केले आहे.

घरबसल्या बिल भरणाऱयांचे प्रमाण वाढले आहे. मोबाईलमध्ये उपलब्ध असणाऱया मोबाईल वॉलेटमधून बिल भरण्यात येत होते. सर्वसामान्य लोकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरत होती. हेस्कॉमच्या बिल भरणा केंद्रांवर जाऊन गर्दी करत बिल भरण्यापेक्षा घरबसल्या हव्या त्या वेळी बिल भरले जात असल्याने या सुविधेचा वापर वाढला होता. परंतु दोन महिन्यांपासून मोबाईल वॉलेटमधून बिल भरले जात नसल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागत होता. यामुळे ही सुविधा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती.

ही सेवा रविवारपासून पूर्ववत केल्याची माहिती हेस्कॉमने दिली आहे. यामुळे ग्राहकांना घरबसल्या पुन्हा वीज बिल भरता येणार आहे. यामुळे ग्राहकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

दुर्गा चषकात बेळगाव स्पोर्ट्स क्लब विजेते

Amit Kulkarni

विठूनामाच्या गजरात किणये- हब्बनहट्टी पायी दिंडीचे प्रस्थान

Patil_p

जिल्ह्यातील दूध उत्पादनात घट

Amit Kulkarni

महाविद्यालयात केवळ 10 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

Omkar B

भारत बंदला कुडचीत उत्स्फूर्त प्रतिसाद

Patil_p

चोवीस तास पाणी योजनेंतर्गत अधिकाऱयांसाठी कार्यशाळा

Omkar B