Tarun Bharat

मोरजी, मांद्रे किनारी भागातील कर्णकश आवाजाने नागरिक त्रस्त

Advertisements

आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी, मोर्चात विद्यार्थ्यांचाही सहभाग

वार्ताहर/ मांद्रे

मोरजी, मांद्रे किनारी भागात रात्रभर सुरु असलेल्या संगीत कार्यक्रमातील कर्णकश आवाजाचा स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर कार्यक्रम बंद करावेत या मागणीसाठी मोरजी ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली मोरजी गावातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून मोर्चा काढला. यामध्ये विद्यार्थी, पालक, महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.

गावडेवाडा आश्वे या भागात संगीत कार्यक्रम चालू असतात. त्या ठिकाणा जवळून मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. कार्यक्रम आयोजकांवर पेडणे उपजिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षकांनी कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

या मोर्चाचे नेतृत्व मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर व पंचसदस्य पवन मोर्जे, विलास मोर्जे, मुक्तेश गडेकर, संपदा शेटगावकर, तुषार शेटगावकर, मजी सरपंच धनंजय शेटगावकर यांनी केले. हा मोर्चा ‘रिबॉर्न मारबेला या आस्थापनाजवळून जात आश्वे येथे आजोबा देवस्थानाशेजारी सभेत रुपांतर झाले.

रात्रभर सुरु असलेल्या या संगीत कार्यक्रमातील कर्णकश आवाजामुळे नागरिक त्रस्त बनले आहेत. अशा प्रकारे हे ध्वनी प्रदूषण सुरू राहिल्यास पंचायत कारवाईचा बडगा उगारेल, असा इशारा यावेळी सरपंच वैशाली शेटगावकर यांनी दिला आहे.

या संगीत कार्यक्रम आयोजित करणाचे कुणाचीही तमा बाळगत नाहीत. विद्यार्थ्यांची परीक्षा काही दिवसांवर आली आहे. त्याना अशा ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत आहे, असे पंच सदस्य विलास मोर्जे यांनी सांगितले.

गोयचो आवाज ही संघटना ध्वनी प्रदूषण विषय राज्य पातळीवर नेणार आहे. दि. 3 फेब्रुवारी पेडणे येथे होणाऱया सभेतही हा विषय मांडला जाईल, असे गोयचो आवाजचे कॅ. विरीयाटो फर्नांडिस यांनी सांगितले.

 पंच सदस्य पवन मोर्जे, माजी सरपंच धनंजय कोले, मांद्रेचे प्रसाद शहापूरकर, जुनसवाडय़ाचे आग्नेल फर्नांडिस, आश्वे मांद्रे येथील महिला शॅली फर्नांडिस, टॅक्सी चालक संजय कोले यांनी या समस्येविषयी आपले विचार मांडले.

सभेचे सूत्रसंचालन प्रसाद शहापूरकर यांनी केले व आभार मानले. या मोर्चात विद्याप्रसारक हायस्कूल, पीटर आल्वारिस हायस्कूल, शिक्षक, पालक, नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. पेडणे पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Stories

रविवारी पणजी येथे प्रतिध्वनी संगीत संमेलन

Amit Kulkarni

एसआयटीकडून भू-माफियाला अटक

Patil_p

दुचाकी चोरटय़ाला कोलव्यात अटक

Amit Kulkarni

कूळ-मुंडकार प्रकरणांसाठी संयुक्त मामलेदारांची नियुक्ती करणार

Patil_p

मंत्री जावडेकरांच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

Patil_p

डॉ.विशाल च्यारी यांना अर्थशास्त्रातील कार्यासाठी पुरस्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!