Tarun Bharat

मोरोपंत पिंगळे यांचे जीवनकार्य राष्ट्र कार्यासाठी प्रेरणादायी : गिरीश प्रभुणे

ऑनलाईन टीम / पुणे :

गो विज्ञान संशोधन संस्था, पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक मोरोपंत पिंगळे यांच्या जन्मशताब्दी सांगता समारोहा निमित्त ज्येष्ठ समाजसेवक गिरीश  प्रभूणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  मोतीबाग येथील संघ कार्यालयात मोरोपंत पिंगळे यांच्या प्रतिमेला गिरीश प्रभुणे,राजेंद्र लुंकड यांनी पुष्पहार अर्पण केला. शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी 7 ते 8:30 या वेळात हे व्याख्यान ऑन लाईन झाले . 


गिरीश प्रभुणे म्हणले,’मोरोपंत पिंगळे यांचा सर्व भारतीय समाजाचा सखोल अभ्यास होता.मोरोपंत पिंगळे महाराष्ट्रात कार्यरत झाले तेव्हा आव्हानात्मक परिस्थिती होती.शिवाजी महाराजांच्या गौरवास्पद इतिहासाला मोरोपंत पिंगळे यांनी शिवचरित्र लेखन,शाहिरी परिषदेतून प्रेरणा दिली.शाहिरी परंपरा शिवकार्याशी पुन्हा जोडण्याचे काम त्यांनी केले.त्यांनी इतिहास संकलन समितीद्वारे हरवलेला इतिहास शोधण्याचे मोठे काम त्यांनी केले.प्रांत प्रचारक ते संघकार्याचे अध्वर्यू असा पिंगळे यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे.

रामजन्मभूमी आंदोलन,सरस्वती नदी शोध यात्रा  या कार्यांना त्यांनी प्रेरणा दिली. चार युगात भारत कसा होता याचा नकाशा त्यांनी तयार करवून घेतला. जनता सहकारी  बँकेची स्थापना त्यांनी केली.राम मंदिराचे पुनर्निर्माण म्हणजे राष्ट्र मंदिराची पुनर्निर्मिती आहे,हा विचार त्यामागे होता. या आंदोलनामुळे देशातील भाषा,प्रांत,जात भेद विसरून सर्व एकत्र आले

Related Stories

रेल्वे कामगार वाहतूक करताना फिजिकल डिस्टन्सिंगकडे होतंय दुर्लक्ष

Archana Banage

लोणावळ्यात स्विमिंगपूलमध्ये बुडून पर्यटकाचा मृत्यू

datta jadhav

इंधन दरवाढीवर सरसकट केंद्राकडे बोट दाखवू नये – चंद्रकांत पाटील

Archana Banage

चिमुरडय़ा ओजससाठी तातडीच्या मदतीचे आवाहन

NIKHIL_N

शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न

datta jadhav

महाराष्ट्रात सर्वांना मोफत लस

Archana Banage