Tarun Bharat

मोर्चा मंत्रालयावर धडकण्यापूर्वीच सोमय्या, पडळकर यांना अटक

ऑनलाईन टीम / मुंबई :

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. हा संप आजही सुरूच आहे. या संपाला पाठींबा देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्त्वात आज मंत्रालयावर एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. मात्र, हा मोर्चा मंत्रालयावर धडकण्यापूर्वीच पोलिसांनी सोमय्या आणि पडळकरांना ताब्यात घेत अटक केली. त्यांना मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

अनेकदा तुरुंगात जाऊ, पण एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देऊ. कितीही वेळा अटक करा. आम्ही कामगारांना न्याय मिळवून देऊ, असं सोमय्यांनी यावेळी सांगितले. तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानावर संपातील कर्मचाऱ्यांची भेट घेतली. आम्ही संपातील कर्मचार्‍यांच्या पाठीशी आहोत आता मागे हटणार नसल्याचे म्हटले आहे.

Related Stories

मंत्री शंभूराज देसाई यांच्या ताफ्यातील पोलिसांना कोरोनाची बाधा

Patil_p

सोलापूर : बंद पुकारणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – प्रहार’ची मागणी

Archana Banage

महाराष्ट्रात मागील 24 तासात 985 कोरोनाचे बळी

Tousif Mujawar

१४ ऑगस्ट आता ‘हा’ दिवस म्हणून ओळखला जाणार; पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

Archana Banage

श्रेयस अय्यर वनडे मालिकेतून बाहेर

Patil_p

महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करण्याची तयारी

datta jadhav