Tarun Bharat

मोसाद प्रमुखपदी डेव्हिड बार्निया

शूर कमांडो म्हणून राहिली ओळख

वृत्तसंस्था/ तेल अवीव

इराण आणि पॅलेस्टाईन यांच्यातील तणावादरम्यान इस्रायलने स्वतःची गुप्तचर यंत्रणा मोसादचा प्रमुख बदलला आहे. पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी इस्रायली एलिट कमांडो फोर्स सायरेट मटकलचे माजी सदस्य डेव्हिड बार्निया यांना मोसादचा नवा प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. बार्निया 2015 पासून या पदावर तैनात योसी कोहेन यांची जागा घेतील. कोहेन यांच्या कार्यकाळात मोसादने विदेशात अनेक यशस्वी गुप्त मोहिमा साकारल्या आहेत.

56 वर्षीय डेव्हिड बार्निया यांना इस्रायलमध्ये अत्यंत कठोर स्वभावाचा व्यक्ती म्हणून ओळखले जाते. 1996 मध्ये मोसादमध्ये सामील होणारे बार्निया यांनी इस्रायलसाठी विदेशात अनेक गुप्त मोहिमा साकारल्याचे मानले जाते. मागील 20 वर्षांपासून ते मोसादच्या त्जोमेट विभागाची धुरा सांभाळत आहेत.

हा विभाग मोसादसाठी हस्तकांची निवड करणे आणि त्यांना भरती करण्याचे काम करतो. 2019 मध्ये बार्निया यांना मोसादच्या उपप्रमुखपदी नियुक्त करण्यात आले होते. मोसाद इस्रायलच्या विदेशातील शत्रूंना हाताळण्याचे काम करते. बाहेरील धोक्यांपासून इस्रायलला वाचविणे ही याची मुख्य जबाबदारी आहे.

Related Stories

अमेरिकेच्या अध्यक्षांवर करचोरीचा आरोप

Patil_p

लोकांचे इंग्रंजी सुधारून झाला अब्जाधीश

Patil_p

मुलाच्या उंचीमुळे बदलले घराचे छत

Patil_p

चिप निर्मितीतील चीनचे प्रभुत्व संपणार

Patil_p

रशियाने चर्चेसाठी पाठवले शिष्टमंडळ; पण युक्रेनने घातली ‘ही’ अट

datta jadhav

पाकिस्तानात पोहोचला नवा संकरावतार

Patil_p