Tarun Bharat

मोसीन इनामदार खून प्रकरणातील ७ आरोपींना अटक

गांधीचौक पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / विजापूर

विजापूर शहरातील गांधीचौक पोलिसांनी शुल्लक कारणावरून दि. 28 मे रोजी रात्री दहाच्या सुमारास मोसीन इनामदार नामक युवकाचा खून केल्याप्रकरणी सात आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर भा. द. वि. कलम 143, 147, 148, 341, 324, 307, 302, 504, 506 अन्वये गांधीचौक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. आसिफ मळ्ळी, रफिक नंद्याळ, साहेब खाद्री, सद्या जाहागिरदार, इरफान जमखंडी, सद्दाम जमखंडी, अफजल जमादार अशी अटक करण्यात आलेल्या सात जणांची नावे आहेत. यांच्याकडून दोन तलवार, एक कार जप्त करण्यात आली आहे. विजापूरचे जिल्हा पोलिसप्रमुख अनुपम अगरवाल, अतिरीक्त पोलिसप्रमुख राम अरसिद्दी यांच्या नेतृत्त्वाखाली गांधीचौक पोलीस स्थानकाचे निरीक्षक रविंद्र नायकोडी, उपनिरीक्षक महांतेश गौडर यांच्या पथकाने दि. 31 मे रोजी ही कारवाई केली आहे.

Related Stories

कर्नाटकातील ११ जिल्ह्यात २१ जूनपर्यंत लॉकडाऊन

Archana Banage

जुन्या बसपासच्या मुदतीत 31 मार्चपर्यंत वाढ

Amit Kulkarni

कर्नाटक: द्वितीय पीयूसी परीक्षा २४ मे ते १० जून या कालावधीत होणार

Archana Banage

राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राचा कायापालट करण्यावर भर: आरोग्यमंत्री

Archana Banage

लसीकरण यादीत खोट्या नोंदी; लाभार्थ्यांची संख्या वाढली

Archana Banage

कर्नाटक: येडियुरप्पा – अमित शाह यांची भेट ; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत झाली चर्चा ?

Archana Banage