Tarun Bharat

मोहडे येथे जनावरांच्या गोठ्याला आग जीवितहानी नाही

Advertisements

वार्ताहर / राशिवडे

मोहडे ( ता. राधानगरी ) येथील ज्ञानदेव गणपती आदिगरे यांच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागून मोठे नुकसान झाले आहे. आगीतुन जनावरे सुखरूप बाहेर काढली मात्र ती काढत असताना मालक किरकोळ जखमी झाले आहेत.
मोहडे येथील ज्ञानदेव गणपती आदिगरे यांचा मोहडे ते वाघवडेकडे जाणाऱ्या रस्त्यावर गोठा बांधलेला आहे. त्याच्या माळ्यावर गवत आणि पिंजर भरले होते. खाली गाई-म्हशी बांधल्या होत्या सायंकाळी पाचच्या सुमारास या गोठ्याला आग लागली. यामध्ये सर्व इमारत जळून खाक झाली’ वैरणही जळून गेली.

आग लागलेली कळताच श्री. आदिगरे यांनी सर्वप्रथम जनावरे बाहेर काढली. या गडबडीत त्यांच्या डोक्यावर विस्तव पडून ते किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर लगेच उपचार करण्यात आले. आग विझवण्यासाठी भोगावती आणि बिद्री साखर कारखान्याचे अग्निशामक दल पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर आग आटोक्यात आली मात्र पूर्ण गोठा खाक झाल्याने आदिगरे यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Stories

देशातील आर्किटेक्चर मैदान गाजवणार

Sumit Tambekar

वाघनख्याचा अलंकार बनेल गळ्यातला फास…

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गोकुळच्या चेअरमनपदी विश्वास पाटील

Abhijeet Shinde

औरंगाबाद येथे झालेल्या स्पर्धेत दोनवडेतील कुस्तीगिरांचे यश

Sumit Tambekar

राधानगरी धरणाचा चौथा स्वयंचलित दरवाजा उघडला; नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

Abhijeet Khandekar

गोव्याच्या साईभक्तावर काळाचा घाला, घुणकी येथे अपघाती मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!