- सुसाईड नोटमध्ये प्रफुल खेडा पटेल यांच्यासह अनेक नेत्यांची नावे
ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्याबरोबरच काँग्रेसचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा आज सभागृहात उपस्थित करण्यात आला. मोहन डेलकर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. या मुद्द्याला उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा केली.


गृहमंत्री देशमुख म्हणाले, दादर नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर हे सात वेळा खासदार होते. सात वेळा खासदार राहिलेला व्यक्ती आत्महत्या करतो. तेही मुंबईत येऊन. त्यांनी सुसाईड नोटमध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्यात त्यांनी दादर नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल खेडा पटेल यांचे नाव घेतलेले आहे. खेडा पटेल आणि इतर अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात होता. वारंवार अडचणी निर्माण केले जात होते. सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या पटेल यांच्या माध्यमातून दिल्या जात होत्या, असे डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलेले आहे, असे देशमुख यांनी यावेळी सांगितले.
डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले होते की, मी मुंबईत येऊन आत्महत्या करतोय, त्रास मला तिकडे असला तरी इथे आत्महत्या करतोय. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यावर माझा विश्वास आहे. मला न्याय महाराष्ट्रातच मिळेल. त्यांच्या पत्नीने कलाबेन मोहन डेलकर यांनी सुद्धा मला पत्र दिलेले आहे. अभिनव मोहन डेलकर यांनीही पत्र दिलेले आहे. यापूर्वी सांगितलेले आरोपच केलेले आहेत, असे
त्यामुळे मोहन डेलकर यांच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटी स्थापन करून करण्यात येईल. त्याचबरोबर नागपूरमध्ये छत्तीसगढमधील एका आयएएस अधिकारी राजेश कुमार श्रीवास्तव यांनीही नागपूरमध्ये येऊन आत्महत्या केली. त्यांचाही तोच उद्देश असावा. ज्या ठिकाणी राजेश श्रीवास्तव अधिकारी आहेत. त्यांना माहिती होत की, भाजप सरकारकडून न्याय मिळणार नाही. मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे देशमुख यांनी यावेळी सांगितले.