Tarun Bharat

मोहरमच्या मिरवणुकांवर बंदी

प्रतिनिधी / सातारा :

राज्यातील कोविड-19 च्या प्रादुर्भावाचा विचार करता सर्वांनी आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याने 19 रोजी पाळण्यात येणारा मोहरम अत्यंत साधेपणाने पाळण्याबाबत मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केल्या आहेत.

मार्गदर्शक सूचनेनुसार मोहरम महिन्याच्या 9 व्या दिवशी म्हणजे 18 ऑगस्ट राजी कत्ल की रात तसेच 10 व्या दिवशी योम-ए-आशुरा हे दिनांक 19 रोजी असून त्यानिमित्ताने मातम मिरवणुका काढण्यात येतात, परंतु सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सध्या बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणुका काढता येणार नाहीत.

कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळण्यात यावा. खासगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावे. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम, दुखवटा करु नये. वाझ, मजलीस हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया, आलम काढू नयेत. सबील, छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी कोविड संदर्भात आरोग्याच्या दृष्टीकोनातून नियमांचे तंतोतंत पालन करावे. सबिलच्या ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इ.) पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱयांनी काढले आहेत.

Related Stories

सातारा : कर्णवडीत मंदिराच्या गाभऱ्यातच पुजाऱ्याला बेदम मारहाण

Archana Banage

साताऱयात आदेश मोडणाऱया 21 जणांवर कारवाई

Patil_p

अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार

datta jadhav

सातारा शहर, परिसरात पाच बाधित

Archana Banage

महिला बचतगटांनी तयार केले मानिनी मास्क

Patil_p

तिजोरीतील खडखडाटाने पालिकेत बचतीचे धोरण

Amit Kulkarni