Tarun Bharat

मोहालीच्या हॉकी स्टेडियमचे नामकरण

Advertisements

वृत्तसंस्था/ चंदीगड

भारतीय हॉकी क्षेत्रातील महान आंतरराष्ट्रीय हॉकीपटू दिवंगत बलबीर सिंग सिनियर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त मोहालीच्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचे नामकरण करण्यात आले. या स्टेडियमला आता बलबीर सिंग सिनियर यांचे नाव देण्यात आले आहे.

भारतीय हॉकी संघाला तीनवेळा ऑलिंपिक पदक मिळवून देणारे बलबीर सिंग सिनियर यांचे गेल्यावर्षी 25 मे रोजी वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले होते. आधुनिक ऑलिंपिकच्या इतिहासामध्ये 2012 साली झालेल्या लंडन ऑलिंपिक स्पर्धेवेळी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने निवडलेल्या जागतिक स्तरावरील 16 लिजेंडस्च्या यादीमध्ये बलबीर सिंग सिनियर या एकमेव भारतीय ऍथलीट्सचा समावेश करण्यात आला होता. मंगळवारी येथे बलबीर सिंग सिनियर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त आयोजलेल्या समारंभात मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचे बलबीर सिंग सिनियर असे नामकरण करण्यात आले. या समारंभाला पंजाबचे क्रीडामंत्री राणा गुरमित सिंग सौदी तसेच भारतीय हॉकी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ऑलिंपिक स्पर्धेत हॉकी या क्रीडाप्रकारात बलबीर सिंग सिनियर यांनी वैयक्तिक सर्वांधिक गोल नोंदविण्याचा विश्व़विक्रम केला असून तो अद्याप अबाधीत आहे. 1952 च्या हेलसिंकी ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱया भारतीय हॉकी संघाने अंतिम सामन्यात हॉलंडचा 6-1 असा पराभव केला होता. या सामन्यात बलबीर सिंग सिनियर यांनी 5 गोल नोंदविले होते. या कामगिरीमुळे 1957 साली बलबीर सिंग सिनियर यांचा पद्मश्री किताब देवून गौरव करण्यात आला होता. 1948 च्या लंडन ऑलिंपिक, 1952 च्या हेलसिंकी ऑलिंपिक आणि 1956 च्या मेलबोर्न ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱया भारतीय हॉकी संघाचे त्यांनी प्रतिनिधीत्व केले होते. 2019 साली पंजाब शासनातर्फे त्यांचा महाराजा रणजीत सिंग पुरस्कार देवून गौरव करण्यात आला होता.

Related Stories

बेंगळूर युनायटेड-अहमदाबाद आज फुटबॉल लढत

Patil_p

स्वप्नील कुसाळेचे पॅरीस ऑलिम्पिक तिकीट निश्चित

Patil_p

हॅलेपची टेनिस स्पर्धेतून माघार

Patil_p

मास्टरब्लास्टर सचिनच्या नव्या हेअर लूकची चर्चा

Omkar B

ऐश्वर्य तोमरचा नवा विश्वविक्रम, नाम्या कपूरला सुवर्ण

Patil_p

रियल काश्मीर सलग दुसऱयांदा अंतिम फेरीत

Patil_p
error: Content is protected !!