Tarun Bharat

मोहालीत ‘किंग कोहली’वर फोकस!

Advertisements

भारत-श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी आजपासून, रोहितसाठी कसोटीत नेतृत्वाचे नवे पर्व सुरु

वृत्तसंस्था /मोहाली

स्टार्स, सुपरस्टार्स व मेगास्टार्सच्या मांदियाळीत सन्मानाने स्थान प्राप्त करत आलेला किंग कोहली अर्थात विराट कोहली आजपासून लंकेविरुद्ध खेळवल्या जाणाऱया पहिल्या कसोटी सामन्यात मुख्य आकर्षण केंद्र ठरणार आहे. विराट कोहलीसाठी ही ऐतिहासिक 100 वी कसोटी असून या निमित्ताने रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधील नेतृत्वपर्वाला देखील प्रारंभ होत आहे. पहिल्या दिवसाच्या खेळाला सकाळी 9.30 वाजता सुरुवात होईल.

1932 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा प्रवास सुरु झाला आणि सुनील गावसकरांच्या 10 हजार कसोटी धावा, सचिन तेंडुलकरची शेवटची कसोटी यानंतर विराटची 100 वी कसोटी विशेष महत्त्वाची असणार आहे. सुनील गावसकर-सचिन तेंडुलकर यांच्याइतकी लोकप्रियता केवळ किंग कोहलीलाच लाभली असून आजपासून लंकेविरुद्ध खेळवल्या जाणाऱया कसोटी सामन्याच्या निमित्ताने किंग कोहलीच सोशल मीडियावर मुख्य आकर्षण केंद्र ठरणार आहे.

प्रतिस्पर्धी संघातील सुरंगा लकमल, लाहिरु कुमारा व लसिथ एम्बुल्डेनियासारख्या साधारण दर्जाच्या गोलंदाजांना सामोरे जाणे हे विराट कोहलीसारख्या अव्वल दर्जाच्या फलंदाजासाठी फाईव्ह कोर्सवर ताव मारण्यासारखे असून विराट येथील लढतीत कव्हर ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, फ्लिक व पूलसारखे भात्यातील फटके प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आतूर असेल, हे ओघानेच येते.

विराटने संघसहकाऱयांमध्ये आणि अगदी चाहत्यांमध्येही सातत्याने जोश निर्माण केला असून आधुनिक क्रिकेटमधील हा सर्वोत्तम फलंदाज अर्थातच आज स्पॉटलाईटवर असेल. या लढतीच्या माध्यमाने रोहितच्या नेतृत्वपर्वाला सुरुवात होत आहे. अवघ्या 34 वर्षांचा रोहित 3 वर्षांपेक्षा अधिक काळ कसोटीत खेळत राहणे अपेक्षित असून भारतीय क्रिकेटमधील हे संक्रमण तो कशा पद्धतीने हाताळतो, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा व इशांत शर्मासारखे अनुभवी खेळाडू मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेले असून हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, रिषभ पंत यांच्यासारखे युवा खेळाडू उणीव भरुन काढण्यासाठी सज्ज असतील. लंकेचा डावखुरा फिरकीपटू एम्बुल्डेनियाला निष्प्रभ ठरवण्यासाठी पंतला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीवर पाठवण्याचा विचार सुरु आहे. लंकन फलंदाजी कर्णधार दिमुथ करुणारत्नेसह दिनेश चंडिमल व अँजिलो मॅथ्यूज यांच्यावरच सर्वस्वी अवलंबून आहे. रविचंद्रन अश्विन व रविंद्र जडेजा या फिरकीपटूंना ते कसे सामोरे जातात, यावरच लंकेचे यशापयश अवलंबून असणार आहे.

माईलस्टोनच्या पूर्वसंध्येला विराटकडून ‘स्ट्रे अनिमल ऍम्ब्युलन्स’चे उद्घाटन

आपल्या 100 व्या माईलस्टोन कसोटीच्या तयारीत व्यस्त असलेल्या विराट कोहलीने गुरुवारी सामन्याच्या पूर्वसंध्येला वेळात वेळ काढून स्ट्रे अनिमल्स ऍम्ब्युलन्सचे उद्घाटन केले. विवाल्डियन्स या विराट कोहली फाऊंडेशनने सदर ऍम्ब्युलन्स सेवा सुरु केली आहे. आवाज स्ट्रे टीमचाही या उपक्रमात सहभाग आहे. विवाल्डियन्सने गतवर्षी भटके प्राणी, जनावरांसाठी रिहॅब व ट्रॉमा सेंटर सुरु केले. त्याचा हा पुढील टप्पा आहे. विराटने आपल्या सोशल नेटवर्क हँडलवरुन या उपक्रमाबद्दलची काही छायाचित्रे व व्हीडिओ अपलोड केले.

Related Stories

पद्मावती रॉयल्स,पी.पी. रॉयल्स, पुष्पांजली, ओशोरा उपांत्य फेरीत

prashant_c

आयर्लंड संघाचा मोसमातील पहिला विजय

Patil_p

मुंबई-बेंगळूर लढतीने आयपीएलचा प्रारंभ होणार

Patil_p

राफेल नदालचे विक्रमी 21 वे ग्रँडस्लॅम जेतेपद

Patil_p

ग्रॅण्डमास्टर पी.इनियनला उपविजेतेपद

Patil_p

चेन्नईचा पाचवा पराभव, गुजरात विजयी

Patil_p
error: Content is protected !!