Tarun Bharat

सातारा : म्युकर मायकोसिसचे जिल्ह्यात चार बळी

तीन बरे होवून घरी गेले ,आठजणांवर उपचार सुरु

प्रतिनिधी / सातारा

कोरोनाची जिल्हय़ावर दहशत असतानाच आता म्युकर मायकोसिसच्या केसेस समोर आलेल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात म्युकर मायकोसिस बाधित रुग्णांवर उपचारासाठी खास कक्ष तयार करण्यात आलेला आहे. मात्र, गेल्या चार दिवसात म्युकर मायकोसिस बाधित चारजणांचा उपचारादरम्यान बळी गेला आहे. तीन जणांवर यशस्वी उपचार झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलेय तर आठ म्युकर मायकोसिस बाधितांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

म्युकर मायकोसिसने मुंबई, पुण्यात प्रवेश केल्यानंतर राज्यभर या नवीन प्रकाराने तोंड वर काढले आहे. मात्र, यावर देखील उपचार उपलब्ध असून त्यासाठी आरोग्य विभाग पुढे सरसावला आहे. दि. 16 पासून जिल्हा रुग्णालयात यावर उपचारासाठी खास कक्ष तयार करण्यात आलेला आहे. जिल्हय़ात म्युकर मायकोसिस अनुषंगाने अनुमानितांची टेस्ट करण्यात आली त्यापैकी 15 म्युकर मायकोसिसने बाधित असल्याचे समोर आल्यावर आरोग्य यंत्रणा अर्लट झाली आहे.

यापैकी गेल्या चार दिवसात म्युकर मायकोसिस बाधितांवर उपचार सुरु असताना चारजणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन बाधितांना यशस्वीपणे उपचार करुन घरी पाठवण्यात आले आहे. सध्या आठ म्युकर मायकोसिस बाधितांवर उपचार सुरु असून ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत, असल्याचे डॉ. सुभाष चव्हाण यांनी ’तरुण भारत’ शी बोलताना सांगितले आहे.

Related Stories

शिवसेनेला भगवान शिवही वाचवू शकत नाही- कंगना राणावत

Abhijeet Khandekar

अपघात दोन कीर्तनकारांचा मृत्यू

Patil_p

राजधानीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचे स्वागत

Patil_p

सातारा : महाबळेश्वर शहर झाले कोरोनामुक्त

Archana Banage

महाराष्ट्रात 5,229 नवे कोरोनाबाधित रुग्ण

Tousif Mujawar

कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेल्या वाई तालुक्यात दोन दिवसात पाच रूग्ण

Archana Banage
error: Content is protected !!