Tarun Bharat

म्युकर रूग्णांना `जीवनदायी’चा आधार.!

5 लाखांपर्यत मोफत उपचार30 सप्टेंबरपर्यत मिळणार `जीवनदायी’चा लाभ,

कृष्णात पुरेकर/कोल्हापूर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत `म्युकर मायकोसीस’चे रूग्ण वाढत आहेत. म्युकर मायकोसीस हे फंगल इन्फेक्शन आहे, त्यामुळे त्यावरील उपचारासाठी महागडी औषधे आहेत. हा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे शासनाने `म्युकर मायकोसीस’चा समावेश महात्मा फुले जनआरोग्य, जीवनदायी योजनेत केला आहे. याद्वारे म्युकरच्या रूग्णांवर 5 लाख रूपयांपर्यतचे उपचार मोफत होणार आहेत. जिल्हÎातील 5 आणि बेळगावमधील केएलई हॉस्पिटलमध्ये म्युकर रूग्णांसाठी ही सवलत उपलब्ध आहे.

कोरोनानंतर काही रूग्णांत म्युकर मायकोसीसचा संसर्ग दिसून आला. राज्यात या रूग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हÎात आजपर्यत म्युकर मायकोसीसने 5 जणांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत साठहून अधिक संसर्गित रूग्ण उपचार घेत आहेत. खासगी हॉस्पिटल्समधील म्युकरवरील औषधोपचाराचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. गतवर्षी कोरोना संसर्गाचा समावेश `जीवनदायी’ योजनेत केला होता. आता `म्युकर मायकोसीस’चा समावेश महात्मा फुले जनआरोग्य आणि पंतप्रधान जनआरोग्य योजनेत झाला आहे. त्यामुळे तो म्युकर मायकोसीस रूग्णांसाठी `जीवनदायी’ मोठा आधार ठरला आहे. .

गतवर्षी कोरोना काळात जीवनदायी योजनेचा लाभ सर्वच घटकांना देण्यात आला. एप्रिलपर्यत त्याला मुदत होती ती 30 जूनपर्यत वाढवली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकर मायकोसीसच्या रूग्णांत वाढ झाली आहे. हे `फंगल इन्फेक्शन’ आहे. यामध्ये मायक्रोबॉयॉलॉजिस्ट, इंटर्नल मेडीसीन स्पेशालिस्ट, इंटेसिव्ह न्युरोलॉजिस्ट, ईएनटी स्पेशालिस्ट, ऑप्थोमोलॉजिस्ट, डेंटिस्ट, प्लास्टीक सर्जन, बायोकेमिस्टच्या मार्गदर्शनाची गरज भासत आहे. त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत `म्युकर मायकोसीस’साठी 10 दिवसांचे `स्टे पॅकेज’ दिले आहे. शस्त्रक्रिया, वैद्यकीय उपचाराशी निगडीत सर्जिकल, मेडीकल पॅकेजमध्ये 19 घटकांतर्गत वैद्यकीय तपासण्या, उपचार समाविष्ट आहेत.

रूग्ण वाढल्याने `म्युकर मायकोसीस’ला जीवनदायी योजनेत समाविष्ट करावे, असा प्रस्ताव राज्य आरोग्य हमी सोसायटीने दिला होता. त्यानुसार शासनाने म्युकर मायकोसीसचा `महात्मा फुले जनआरोग्य’ योजनेत समावेश केला आहे. त्याचा लाभ सर्व पात्र लाभार्थींना मिळणार आहे. प्रती कुटुंब वार्षिक दीड लाख तर पंतप्रधान आरोग्य योजनेतही तितकेच विमा संरक्षण आहे. त्यापुढे हमी तत्वावर 5 लाखांपर्यतचे उपचार मोफत आहेत. `जीवनदायी’तून 30 सप्टेंबरपर्यत यावर उपचार घेता येणार आहेत. त्यानंतर मुदतवाढीचा निर्णय शासन घेणार आहे.

5 हॉस्पिटलमध्ये उपचार

जिल्ह्यात म्युकर मायकोसीस रूग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून सीपीआर हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल कदमवाडी, डायमंड हॉस्पिटल नागाळा पार्क, ऍपल हॉस्पिटल कदमवाडी, सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरीमठ या 5 हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. केएलई हॉस्पिटल बेळगावचा यामध्ये समावेश आहे. 5 लाखांपर्यतचे उपचार मोफत होणार आहेत. त्यासाठी रेशनकार्ड, कोणतेही ओळखपत्र आवश्यक असल्याची माहिती जीवनदायी योजनेचे जिल्हा समन्वयक राहुल तवर यांनी दिली.

Related Stories

कोल्हापूर जिल्हय़ात आज कोरोनाचे 51 बळी, 1 हजार 494 नवे रुग्ण

Archana Banage

कोल्हापूरचा सराफ बाजार राहणार तीन दिवस बंद

Archana Banage

उजळाईवाडीत घरफोड्यांचे सत्र सुरूच

Archana Banage

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर

Archana Banage

मुंबई-कर्नाटकचे नाव बदलून कित्तूर कर्नाटक करणार: मुख्यमंत्री बोम्मई

Archana Banage

कोल्हापूर : शिरोळमधील धाडसी युवकांनी केलं महाड दुर्घटनेत कौतुकास्पद काम

Archana Banage