Tarun Bharat

म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेत विक्रमी वाढ

Advertisements

सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे प्रमाणही वाढले, उसळत्या शेअरबाजारामुळे लाभ

वृत्तसंस्था / मुंबई

जानेवारीत आलेली मरगळ मागे टाकून आता म्युच्युअल फंड क्षेत्र नव्या भरारीसाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. विविध म्युच्युअल फंड कंपन्यांच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या गुंतवणुकीत व मालमत्तेत 3.7 टक्क्मयांची घसघशीत वाढ झाली असून या मालमत्तांचे एकंदरीत मूल्य 31.6 लाख कोटी झाले आहे.

2020 च्या डिसेंबर महिन्यात हे मूल्य 31 लाख 2 हजार कोटी इतके होते. गेल्यावषीच्या जानेवारी महिन्यापेक्षा ते कमी असल्याने म्युच्युअल फंड उद्योगामध्ये काहीसे निराशेचे वातावरण होते. लॉकडाऊन नंतरच्या काळात अर्थव्यवस्थेतील इतर क्षेत्रे वेगाने वाढत असताना म्युच्युअल फंड क्षेत्राची वाढ मात्र यथातथाच होती. तथापि, फेब्रुवारी महिन्यापासून चित्र बदलण्यास सुरुवात झाली असून आगामी पाच-सहा महिन्यांमध्ये म्युच्युअल फंड कंपन्या पुन्हा भरात येण्याची शक्मयता आहे.

ऍसेट अलोकेशन योजनांमध्ये सर्वाधिक 2 हजार 6 कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे दिसून येते.
ऍसेट अलोकेशन योजनांमधील लवचिकतेचा लाभ गुंतवणूकदार घेताना दिसून येत आहेत, असे तज्ञांचे मत आहे. तथापि, फेब्रुवारीमध्ये म्युच्युअल फंडांमधून पैसे काढून घेण्याचे प्रमाणही वाढले आहे.

इक्विटी सेव्हिंग्ज, हायब्रीड स्किम्स, मल्टीऍसेट अलोकेशन योजना इत्यादींकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष आहे. हायब्रीड योजनांमधील गुंतवणुकीमध्ये 6.6 टक्के वाढ होऊन एकंदर मूल्यात 20 हजार 971 कोटींची वाढ झाली आहे. सध्या या योजनांमधील एकंदर गुंतवणूक 3 लाख 38 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये हे मूल्य 3.43 लाख कोटी इतके होते. त्यापेक्षा या फेब्रुवारी महिन्यातील मूल्य कमी दिसत असले तरी कोरोनाने झाकोळलेल्या कालावधीचा विचार करता ही वाढ लक्षणीय मानली जात आहे.

Related Stories

सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीसंदर्भात शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले “निर्णय बदलल्यास…”

Archana Banage

”युपीए राज्याचा विषय नाही त्यामुळे जिल्हा स्तरावरील लोकांनी बोलू नये”

Archana Banage

एका दिवसात पावणेसात हजार नवे रूग्ण

Patil_p

छठघाट पाहणीदरम्यान नितीशकुमार बचावले

Patil_p

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा वाहनधारकांना ‘चटका’

Patil_p

प्रियंका गांधी ललितपूर दौऱ्यावर; मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

Archana Banage
error: Content is protected !!