Tarun Bharat

म्युच्युअल फंडातून 10 हजार कोटी काढले

Advertisements

गुंतवणूकदारांची नफाकमाई, लार्ज कॅप फंड आघाडीवर : म्युच्युअल फंडात 26 हजार कोटींची भर

वृत्तसंस्था/ मुंबई

डिसेंबरमध्ये इक्वीटी म्युच्युअल फंडांच्या गुंतवणूकदारांनी 10 हजार 147 कोटी रुपये काढले आहेत. इक्वीटी म्युच्युअल फंडांचे गुंतवणूकदार गेले सहा महिने सतत पैसे काढण्यावर भर देत आहेत. मार्चनंतर शेअर बाजारात तेजी दिसून आल्याने त्या काळात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा गुंतवणूकदारांना झाला आहे.

सध्या बाजार चढत्या स्तरावर असल्याने गुंतवणूकदार नफा वसुली मिळवण्याच्या मागे लागले असल्याचे सांगण्यात येते. गुंतवणूकदारांचा एकंदर कल पाहता बाजारातील तेजी पाहून गुंतवणूकदार गुंतवणूकीतून नफा मिळवण्यासाठी पैसे काढून घेत असल्याचे दिसते आहे, असे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इंडिया यांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये 12 हजार 917 कोटी रुपये काढले होते. त्यातून डिसेंबरमध्ये गुंतवणूकदारांनी 2 हजार 770 कोटी रुपये कमीच काढले आहेत.

गेल्या डिसेंबरमध्ये इक्वीटी म्युच्युअल फंडामध्ये एकूण 26 हजार 73 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. गुंतवणूकदारांनी लार्ज कॅप फंडातून सर्वाधिक पैसा काढून घेतला आहे. लार्ज कॅपमधून तीन हजार 876 कोटी रुपये काढण्यात आले आहेत. मल्टी कॅप फंडातून 3540 कोटी रुपये काढण्यात आले आहेत.

दुसरीकडे सेक्टोरल फंडमध्ये 3412 कोटी रुपये गुंतवले गेले आहेत. डिव्हिडंड यील्ड फंडमध्ये 1 हजार 409 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. बाजारात आलेली तेजी पाहून अनेक गुंतवणूकदारांनी आपला नफा वसूल करण्यासाठी रक्कम काढून घेतली आहे. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्यावर जोर दिला आहे. डिसेंबरमध्ये त्यांनी 37 हजार 293 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले आहेत. नोव्हेंबर महिन्यामध्ये 48 हजार 339 कोटी रुपयांचे समभाग विक्री करण्यात आले होते.

Related Stories

उच्चांकी तेजीसोबत सेन्सेक्स, निफ्टी बंद

Patil_p

एचसीएल टेक्नॉलॉजीसची घोडदौड सुसाट

Patil_p

. संकटातून संधी शोधायला हवी

Patil_p

लक्झरी कार्सच्या विक्रीत घट

Omkar B

…अखेर चार दिवसांच्या घसरणीला विराम!

Patil_p

पाम तेलाच्या आयातीत डिसेंबरमध्ये घट

Patil_p
error: Content is protected !!