Tarun Bharat

…म्हणून अजित पवारांनी नाकारली शिवथाळी

Advertisements

ऑनलाईन टीम/पुणे

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आघाडी सरकारने आज, शिवभोजन थाळी सुरू केली आहे. पुणेपिंपरी चिंचवड शहरात या उपक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील उपाहारगृहात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी ही शिवथाळी नाकारली. मात्र याचे कारणही अजित पवार यांनी दिले आहे.

उद्घाटनानंतर अजित पवार यांना पत्रकारांनी ही थाळी खाण्याचा आग्रह केला. यावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर देत ही शिवभोजन थाळी नाकारली. ‘मी जेवलो की तुम्ही लगेच ब्रेकिंग चालवाल. पवारांनी गोरगरिबांच्या थाळीवर ताव मारला. त्यांच्या या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

तर, निवडणुकीपूर्वी आघाडी सरकारने शिवभोजन थाळी देणार, त्या घोषणेप्रमाणे आम्ही गोरगरिबांसाठी ही थाळी देत असल्याचे पवार म्हणाले. या थाळीचा लाभ होतकरू गरिबांनी घ्यावा, ज्यांची ऐपत आहे त्यांनी यांचा लाभ घेवू नये असेही आवाहनही त्यांनी यावेळी केले. याचबरोबर यामध्ये काही त्रुटी असतील तर त्यांचा देखील विचार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुणेपिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या टप्यात 11 ठिकाणी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. स्वयंपाकगृह आणि 25 माणसे एकाचवेळी जेवू शकतील अशी व्यवस्था असणार्‍यांना या योजनेचा ठेका देण्यात आला आहे.

Related Stories

सोलापूर : प्रशासनाची परवानगी नाही; पण यात्रेची जय्यत तयारी

Abhijeet Shinde

अवैध धंदेवाल्याशी पोलीसांनी सहभाग ठेवल्यास कारवाई – पोलीस अधीक्षक

Abhijeet Shinde

दहा कोटींचे ड्रग्ज पोटात लपविले; 9 अटकेत

prashant_c

हन्नूर रस्त्यावर दोघा चंदन तस्करांना रंगेहाथ पकडले

Sumit Tambekar

वाळू चोरी प्रकरण : पोलीस कर्मचारी विकी गायकवाडला तीन दिवस पोलीस कोठडी

Abhijeet Shinde

विसावा नव्हे पंढरपूरपर्यंत 40 वारकऱ्यांच्यासह पायी जाण्याचा आग्रह : प्रशासनाशी चर्चा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!