Tarun Bharat

…म्हणून पक्षातील चौघांसह 6 जणांना घातल्या गोळ्या

ऑनलाईन टीम / प्योंगयांग: 

संघटित वेश्याव्यवसायाच्या आरोपाखाली उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी स्वपक्षातील चौघांसह 6 जणांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. संघटित वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे आरोप सिद्ध झाल्यानंतर 20 जुलैला प्योंगयांगमध्ये या सहा जणांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यावेळी किम जोंगही उपस्थित होते.

उत्तर कोरियामध्ये वेश्या व्यवसायाची 1 ते 5 वर्षे कठोर शिक्षा आहे. मात्र, या प्रकरणात सत्ताधारी वर्कर्स पक्षाचे नाव पाहून देशात योग्य संदेश जाण्यासाठी किम जोंग यांनी वेश्याव्यवसायांविरूद्ध युद्ध छेडत आरोपींना ठार करण्याचे आदेश दिले. गोळ्या घालण्यात आलेल्या 6 जणांमधील 4 जण किम जोंग उन यांच्या पक्षातील अधिकारी होते. त्यांच्या पक्षातील आणखी काही अधिकारी या प्रकरणात गुंतल्याची माहिती समोर आली आहे.

महाविद्यालयीन तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून आरोपींनी या प्रकरणात ओढण्यात आले होते. यामधील बहुसंख्य मुलींचे वय 20 वर्ष आहे. मुलींना अगोदर पैसे देण्यात आले. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ओढण्यात आल्याचे या मुलींनी पोलिसांना सांगितले. 

Related Stories

पुढीलवर्षीही निर्बंध

Patil_p

कोरोना : WHO ने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

datta jadhav

पुनर्संसर्गाची चौकशी

Patil_p

ड्रग्ज तस्करांचे संशयास्पद विमान क्विंटाना रू प्रांतात उतरले

datta jadhav

बांग्लादेश दौरा ; नरेंद्र मोदींचा ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सत्कार

Archana Banage

जागतिक शांततेसाठी मोदींच्या नावाचा प्रस्ताव

Amit Kulkarni