Tarun Bharat

“… म्हणून मला बाजूला केलं ”; एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर निशाणा

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. गुरुवारी पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना खडसे यांनी आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये असल्याने आपल्याला बाजूला करण्यात आलं, आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आल्याचे गंभीर आरोप भाजपच्या राज्यातील नेतृत्वावर केले आहेत. वापरा आणि फेकून द्या असे भाजपचे धोरण असल्याचा टोलाही यावेळेस खडसेंनी लगावला. यासाठी त्यांनी स्वत:बरोबरच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींचाही उल्लेख केला आहे.

error: Content is protected !!