Tarun Bharat

… म्हणून रविनाला ऐकावे लागले टोमणे

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीनाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. रवीना फक्त तिच्या अभिनयासाठीच नाही तर बेधडकपणे बोलण्यासाठी ही ओळखली जाते. सध्या रवीना ही तिच्या आगामी ‘आरण्यक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रवीना ही अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जिने मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे रवीनाने वयाच्या 21 व्या वर्षी दोन मुली दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी छाया 11 वर्षांची आणि पूजा 8 वर्षांची होती. मात्र या दोन्ही मुलींना दत्तक घेणे फार कठीण होते. यामुळे तिला कित्येक जणांचे टोमणे ऐकावे लागले, असा खुलासा रवीनाने एका मुलाखतीदरम्यान केला होता. तिला छाया आणि पूजाबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते.

  यावेळी तिने मुली दत्तक घेण्याच्या निर्णयापासून त्यांचे पालनपोषण करण्याच्या जबाबदारीपर्यंत सर्व गोष्टींवर खुलासा केला. ‘ही संपूर्ण घटना 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ चित्रपटापूर्वीची आहे. मी आणि माझी आई दर विकेंडला आशा सदनसारख्या अनेक अनाथाश्रमात जायचो. काही वर्षांनी माझ्या चुलतभावाचे निधन झाले. त्याला छाया आणि पूजा अशा दोन मुली होत्या. मात्र त्यांचे कुटुंबीय त्या दोन्ही मुलींशी फार वाईट प्रकारे वागत होते. त्यामुळे मी त्यांना घरी आणले, असे रवीना म्हणाली.

Related Stories

ओटीटी हे कलाकारांसाठी वरदान

Patil_p

सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला एनसीबीकडून अटक

Archana Banage

मास्टर’पेक्षा वरचढ ठरला ‘वकील साब’

Patil_p

मिशेल मोरोनची लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री

Patil_p

शिवसेना नाही ‘सोनिया सेना’ : कंगना

Tousif Mujawar

शशांकचा चढला पारा

Patil_p