Tarun Bharat

म्हसवेच्या माजी सरपंचावर खुनी हल्ला

वार्ताहर/ कुडाळ

जावली तालुक्यातील वडाचे म्हसवे म्हणून ओळखल्या जाणाऱया गावचे माजी सरपंच संजय शिर्के यांच्यावर जमिनीच्या वादातून त्याच गावातील विद्यमान सदस्याने डोक्यात खोऱयाचा दांडा मारून खुनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात संजय शिर्के  यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जखमी झाले आहेत.

 याप्रकरणी विद्यामान ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पोपट शिर्के यांच्यासह पाच जणांवर खुनी हल्ला केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित म्हणून आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय शिर्के हे आपल्या शेतातील उसाला पाणी देत होते. याच दरम्यान ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पोपट शिर्के, हणमंत यशवंत शिर्के, यशवंत शिवराम शिर्के, प्रकाश पोपट शिर्के, दत्तात्रय यशवंत शिर्के या पाचजणांनी जमिनीच्या वादातून संजय शिर्के यांना खोरे डोक्यात घालून लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून अधिक तपास एपीआय निळकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय चामे करत आहेत.

Related Stories

नगराध्यक्षांचा बेंचसाठी साडे सतरा लाखांचा फंड

Patil_p

नदीवरील पूल गेला वाहून; 65 गावांचा संपर्क तुटला

datta jadhav

शेतकरी विरोधी तिन्ही कायदे रद्द करा

Patil_p

सातारा : दैव बलवत्तर होत म्हणून वाचला जीव…

Archana Banage

महाराष्ट्र कुस्ती लीग पुन्हा सुरु करण्यासाठी सहकार्य करु : खा.शरद पवार

Patil_p

स्वराज्य भूमीतून मावळ्यांचे पानिपतला प्रस्थान

datta jadhav