प्रतिनिधी / गारगोटी
म्हसवे ता. भुदरगड येथील रेश्मा अजित कांबळे (वय २४)या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबत ची फिर्याद पती अजित धोंडीराम कांबळे(वय ३२) याने भुदरगड पोलिसात दिली आहे.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी रेश्मा कांबळे ( वय २४) या विवाहितेने किरकोळ वादातून रविवारी दि १ नोव्हेंबर रोजी घरात आजारी सासरा वगळता अन्य कोणीही घरात नसल्याचे पाहून गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतात भुईमूग काढण्याचे काम सुरू असल्याने घरातील माणसे शेताला गेली होतीत.
घरात कोणी नसल्याचे पाहून सकाळी अकराच्या सुमारास राहत्या घराच्या माळ्यावर रेश्मा हिने गळफास लावून घेतला. माळ्यावरून कसला तरी आवाज आला म्हणून आजारी असलेला सासरा धोंडीराम कांबळे यांनी माळ्यावर जाऊन पाहिले असता रेश्मा गळफास घेऊन टांगलेली दिसली. सव्वा वर्षाची मुलगी असताना रेश्माने केलेल्या कृत्यामुळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक अमित देशमुख करीत आहेत. तिच्या पश्चात पती,सव्वा वर्षांची मुलगी,सासू,सासरा, दिर ,आई वडील असा परिवार आहे