Tarun Bharat

म्हाऊस गावात पिण्याच्या पाण्याची समस्या

ग्रामस्थांत संताप, दसरोत्साच्या आंनदावर विरजण

प्रतिनिधी /वाळपई

सत्तरी तालुक्मयातील म्हाऊस गावामध्ये पारंपरिक दसरा साजरा करण्याची परंपरा रुढ झालेली आहे. यंदाही दसरा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून उत्साहाला उधाण आलेले आहे. मात्र पिण्याच्या पाण्याची कमतरता यामुळे नागरिकांच्या या आनंदावर विरजण पडले आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त करण्यात येत असून ण्याच्या पाण्याची कमतरता यामुळे सध्यातरी गावातील ग्रामस्थ संतप्त बनलेले आहेत .आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी हा मुद्दा गांभीर्याने घेऊन या गावातील समस्या सोडविण्यावर प्राधान्य द्यावे अशा प्रकारची मागणी या गावातील ग्रामस्था?नी केली आहे.

याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील माऊस गावातून गेल्या शेकडो वर्षापासून पारंपारिक दसरा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. गेल्या चार दिवसांपासून शेकडो नागरिक या दसरोत्सव परंपरेमध्ये सहभागी होताना दिसत आहे. मात्र गेल्या चार दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या याठिकाणी निर्माण झालेली आहे .यामुळे ग्रामस्थानी तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केलेला आहे. अनेकवेळा अधिकाऱयांशी संपर्क साधून सुद्धा त्याकडे लक्ष देण्यात येत नसल्याचे ग्रामस्था?चे म्हणणे आहे. यामुळे अनेकांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याशी संपर्क साधून या संदर्भाची माहिती देणार देण्यात आली.

मात्र अजून पर्यंत ही समस्या सुटलेली नाही .पर्यायी उपाययोजना म्हणून टॅकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र सदर व्यवस्था अपुरी पडत असून  उत्साहावर सध्यातरी या नागरिकांच्या आंनदावर विरजण पडलेले आहे .काही ग्रामस्था?नी दिलेल्या अधिक माहितीनुसार यासंदर्भातील जाणीव व यापूर्वी संबंधित खात्याचे यंत्रणेला देण्यात आली होती. मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आलेले नाही. दरम्यान याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार या कार्यालयांमध्ये अपुरा अधिकारीवर्ग असल्याची माहिती समोर आली आहे. .नुकत्याच काही अधिकाऱयांची बदली इतरत्र करण्यात आलेली आहे. यामुळे येणाऱया काळासुद्धा या कार्यालयावर मोठय़ा प्रमाणात कामाचा ताण वाढण्याची शक्मयता असून परिणामी अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्यास ती हाताळणे कठीण बनणार आहे.

Related Stories

‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत ३२६ भारतीय लंडनहून मायदेशी दाखल

Archana Banage

गोवा डेअरीला खास आमसभेसंबंधी सहकार निबंधकाची नोटीस

Amit Kulkarni

पारंपरिक नागपंचमी साजरी करण्यासाठी सत्तरी तालुका सज्ज

Omkar B

निवडणूक गैरप्रकार रोखण्यासाठी शॅडो कौन्सिल मोहीम राबविणार

Omkar B

गुलमोहराचे झाड चालत्या गाडीवर कोसळले

Patil_p

बागवाडा मोरजी येथे पायवाटेवरून तणाव

Amit Kulkarni