मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही, 111 कोटी खर्चुन गांजे पाणीसाठा प्रकल्पाचे उदघाटन


प्रतिनिधी /वाळपई
म्हादई नदीच्या अस्तित्वा संदर्भात कोणत्या प्रकारची तडजोड केली जाणार नाही. कर्नाटक सरकारने कितीही आताताईपणा केला तरीसुद्धा नदीचे अस्तित्व अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून गोवा सरकार गंभीर आहे. गोव्यातील 60 टक्के जनता ही म्हादई नदीवर अवलंबून आहे .म्हादई नदी ही आपली जीवनदायिनी आहे. यामुळे नदीच्या बाबतीत कोणत्या प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचे महत्त्वपूर्ण विधान राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
जलस्तोत्र खात्यातर्फे गांजे या ठिकाणी बांधण्यात आलेल्या पाणीसाठा प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. 111 कोटी खर्चून सदर प्रकल्प उभारण्यात आला असून पुढील दहा वर्षे फोंडा व तिसवाडी तालुक्मयाला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही याची विशेष दखल घेण्यात आलेली आहे .राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विचारांतून हा प्रकल्प साकार झालेला आहे .जलस्रोत खात्याच्या तत्पर व कार्यक्षम यंत्रणेमुळे दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांनी खात्याचे प्रमुख अभियंता प्रमोद बदामी व त्यांच्या सहकाऱयांचे अभिनंदन केले .आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पावसकर उजगाव गांजे जिल्हा पंचायत सभासद उमाकांत गावडे उजगाव गांजे पंचायतीच्या सरपंच अस्मिता गावडे पंचायत सभासद सुषमा गावकर, पाळी सरपंच प्रशिला गाशडे, पंचायतीचे उपसरपंच महेश गावस नाबार्ड या संस्थेचे विशाल देशपांडे व इतरांची यावेळी उपस्थिती होती..
यावेळी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. राजकीय फायदा घेण्यासाठी काही राजकीय पक्ष पर्यावरणाचा ऱहस करू लागले आहेत . पोस्टरबाजीच्या माध्यमातून पर्यावरणाचे नुकसान होत असून पश्चिम बंगालमध्ये पारंपारिक संस्कृतीचा ऱहास करणारे व दिल्ली याठिकाणी हवा प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलेले राजकीय पक्ष गोव्यामध्ये येऊन करण्याचा प्रयत्न करीत आहेत .मात्र गोवेकरी जनता ही हुशार आहे .येणाऱया विधानसभा निवडणुकीत या पक्ष्यांना त्यांची जागा दाखवा अशा प्रकारचे आवाहन त्यांनी केले .
या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी जागा देणाऱया जमीन मालकांचा यावेळी त्यांनी खास गौरव केला व अशा प्रकारची विचारधारा ही खरोखरच कौतुकाची बाब असल्याचे यावेळी ते म्हणाले.
गेल्या पाच वर्षांमध्ये सरकारने पायाभूत सुविधांच्या माध्यमातून गोव्याचा विकासाला वेगळय़ा प्रकारची चालना दिलेली आहे. वेगवेगळय़ा प्रकारच्या योजना राबवून आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा याचा संदेश देत आज ग्रामीण भागांमध्ये विकासाचा झंझावात सुरू झालेला आहे .पुढील पाच वर्षांमध्ये गोवा समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितच प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
म्हादई नदीच्या अस्तित्वात संदर्भात व कर्नाटकाच्या हेकेखोरी संदर्भात बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले या नदीचे पाणी वाया जात असल्याचे बोंबाबोंब सुरू आहे. मात्र या प्रकल्पाच्या माध्यमातून गोव्यातील जनता या पाण्याचा पूर्णपणे पिण्यासाठी वापर करणार असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
सुरुवातीला जलस्तोत्र खात्याचे प्रमुख अभियंता प्रमोद बदामी यांनी एकूण या प्रकल्पासंदर्भात सविस्तरपणे माहिती दिली. हा प्रकल्प 111 कोटी खर्चून बांधण्यात आला असून गोवा सरकारने यासाठी चांगल्या प्रकारचे पाठिंबा दिल्याचे यावेळी ते म्हणाले. हा प्रकल्प स्वप्नवत असून 65 लाख घनमीटर पाण्याचा साठा होणार आहे. या पाण्याचा साठा
खांडेपार नदीमध्ये सोडण्यात येणार असून खांडेपार नदीचे पात्र जिवंत राहणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून या पाण्याचा पुरवठा फोंडा व तिसवाडी भागाला करण्यात येणार असून यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई पूर्णपणे दूर होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले .त्याचप्रमाणे या प्रकल्पासाठी चांगल्या प्रकारचे योगदान देणाऱया कंत्राटदारांचे यावेळी त्यांनी कौतुक केले..
सुरुवातीला फीत कापून प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले .यावेळी या प्रकल्पाच्या चार दरवाजांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आले. त्यानंतर पंप घराचे उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले..
या प्रकल्पासाठी मोफत जमीन देणाऱया कुटुंबियांचा या वेळी मुख्यमंत्री हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .या विशांत तिळवे उमाकांत गावडे ऋषभ गावकर जितू गावकर अशोक गावकर देवेंद्र गावकर उसगावकर कुटुंबीय नरेंद्र गावकर यांचा समावेश आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण नार्वेकर यांनी केले व शेवटी त्यांनीच आभार मानले.