Tarun Bharat

म्हापशाच्या चौफेर विकासासाठी सातव्यांदा निवडून देतील- सुधीर कांदोळकर

Advertisements

प्रतिनिधी / म्हापसा

गेल्या सहा वर्षापासून आपल्यावर विश्वास ठेवून वॉर्ड 19 चे नागरिक आपल्यास निवडून देत आहेत. आपल्या वॉर्डातील सर्व समस्या सोडविण्याकडे आपण भर दिला आहे. बारीक सारीख गोष्टी आहे त्या पूर्वपदावर आणू. म्हापशाच्या चौफेर विकासासाठी म्हापसातील नागरिक आपल्यास निवडून देतील अशी माहिती म्हापशाचो एकवटचे प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर यांनी दिली. आपल्या वार्डात प्रचारावेळी ते बोलत होते.

आपल्या वॉर्डात युवा पिढीला क्रीडा मैदान व वयोवृद्धांसाठी जॉगर पार्क, रवींद्र भवन हे डाऊन टाऊन योजनेंतर्गत उभारण्यात येईल. दिल्ली प्रगती मैदानाप्रमाणे येथे उभारण्यात येईल. आपल्या वॉर्डात सर्व समस्या सोडविल्या आहे. आपल्या वॉर्डात मोठी समस्या मलनिःस्सारण प्रकल्पाची. हा भाग सखोल आहे येथे एक मीटर खोदला तरी पाणी येते. येथील काही विहीरि प्रदूषित झाल्या आहेत. आपण सातव्यांदा निवडणुकीत उतरलो आहे. सर्वांनी आपल्यास सहकार्य केले आहे. सर्वजण नगरसेवक म्हणून आपल्याकडून सेवा करून घेतात ते आपल्यावर सर्वजण विश्वास ठेवतात. त्या सर्वांचे प्रश्न समस्या सोडविण्यास आपण सदैव तत्पर असल्याचे ते म्हणाले. म्हापशाचा विकास झाला नाही म्हणून मी निवडणुकीत उतरलो. ज्या योजना आहे डाऊन टाऊन, बसस्थानक, बायपास रस्ता यासाठी आपण एनओसी घेतलेली आहे. पण कुणाचे नाव होणार म्हणून हे बघत नाही. मलनिःस्सारण हा मुख्य प्रकल्प आहे. तार नदी प्रदूषित झाली आहे. यासाठी म्हापशेकारांचो एकवट झाला आहे. यासाठी चांगले उमेदवार मिळाले आहे. जी बाकी राहिलेली कामे आहे ती करण्याकडे भर दिला जाईल. म्हापशेकर आमच्या पॅनलला निवडून देतील व आम्ही सर्व मिळून म्हापशाचा विकास साधण्याकडे भर देऊ असे कांदोळकर म्हणाले.

Related Stories

व्हीपीके अर्बनवर परिवर्तन

Amit Kulkarni

सांगे, केपे, मुरगावात भाजप : मडगावात युती

Amit Kulkarni

वाघाच्या मृत्यूनंतर वनखात्याची यंत्रणा टार्गेट

Patil_p

कोरोनाग्रस्तांची संख्या 48

Omkar B

मडगाव पालिका मुख्याधिकाऱयांच्या वाढदिन पार्टीत कोविड अटींचा फज्जा

Omkar B

साप्ताहिक बाजार परिसर साफ ठेवण्याची जबाबदारी पालिकेची

Amit Kulkarni
error: Content is protected !!