Tarun Bharat

म्हापशातील ओल्या कचऱयावर प्रतिदिन 10 टन प्रक्रिया करण्याचा विचार- मंत्री मायकल लोबो

बाजारपेठेतील सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तीचे घेतले दर्शन

प्रतिनिधी/ म्हापसा

म्हापसा शहरातील प्रतिदिन किमान पाच टन ओल्या कचऱयावर साळगाव येथील प्रकल्पात प्रक्रिया येत्या आठवडाभरात सुरू केली जील. पण त्यासाठी पालिकेने गांभीर्य दाखविणे आवश्यक आहे. नजीकच्या काळात ते प्रमाण दहा टनापर्यंत वाढविण्यास कोणतीही अडचण नाही. असे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी स्पष्ट केले.

म्हापसा बाजारपेठेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या तसेच काही नगरसेवकत्या विनंतीनुसार गणेशोत्सवातील श्रीमूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी नगरसेवक सुधीर कांदोळकर, कमल डिसोझा, ऍड. शशांक नार्वेकर, डॉ. नूतन बिचोलकर, तारक आरोलकर, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तुषार टोपले उपस्थित होते.

मंत्री मयाकल लोबो म्हणाले की, म्हापसा शहरात घरोघरी कचरा गोळा करण्याचे प्रमाण केवळ पन्नास टक्के आहे. गोळा केला जाणारा कचरा केवळ गणेशपुरी येथे एकत्रित केला जातो. त्यावर प्रक्रियाही होत नाही. म्हापशात कित्येक समस्या आहेत त्यात कचरा गोळा करण्याची समस्या सर्वाधिक गंभीर आहे. या शहरात दररोज सुमारे 35 ते 40 टन ओला कचरा जमा होतो. काही महिन्यांपूर्वी टाळेबंदीमुळे म्हापसा बाजारपेठ तसेच उपाहारामुळे पूर्णतः बंद असल्याने तो आलेला कचरा सुमारे 20 टन व्हायचा. पण आता पुन्हा त्याचे प्रमाण वाढलेले आहे.

पूर्वी कळंगूट, कांदोळी भागामध्ये ओल्या कचऱयाच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले होते. असे नमूद करून लोबो म्हणाले स्थानिक पंचायतींनी या समस्येसंदर्भात गांभीर्य दाखविल्यानेच ती समस्या कमी होऊ शकली. तेथील लोकांना त्या विषयासंदर्भात शिक्षित करण्यासाठी 3-4 महिने लागले. कहींकडून दंडही वसूल करण्यात आल्याने लोकांना शिस्त लागली. पूर्वी त्या भागात दारोदारी कचरा गोळा केला जात असतानाही काही लोक एखाद्या झाडाखाली अथवा वीज खांबाच्या मुळाशी कचरा फेकायचे. परंतु जनजागृती केल्याने तसेच घरोघरी जाऊन कचरा व्यवस्थित उचलला जात असल्याने ओल्या कचऱयाचा प्रश्न आता त्या भागात भेडसावत नाही.

पुढे बोलताना कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो म्हणाले की, गोव्यात एकाही पंचायत किंवा पालिका क्षेत्रात स्वतःच्या भागातील कचऱयावर प्रक्रिया केली जात नाही. केवळ कचरा व्यवस्थापन मंडळाच्या साळगाव येथील प्रकल्पात कचऱयावर प्रक्रिया केली जाते. आता लवकरच दक्षिण गोव्यातही कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. त्या प्रकल्पांच्या आधारे मोठय़ा प्रमाणात वीजनिर्मिती केली जाणार आहे. सध्या साळगाव येथील प्रकल्पात थोडीफार वीजनिर्मिती केली जात आहे. दक्षिण गोव्यासाठीचा प्रकल्प येत्या 1-2 महिन्यात कार्यान्वित होईल. म्हापसा पालिकेने केलेल्या विनंतीनुसार आम्ही म्हापशातील पाच टन ओल्या कचऱयावर प्रक्रिया करण्यास मान्यता दिली आहे.

Related Stories

अर्जेंटिना-पराग्वे सामना बरोबरीत

Patil_p

लंकन क्रिकेट संघाचे भारताकडे प्रयाण

Patil_p

टेनिस स्पर्धेसाठी दोन हजार शौकिनांना परवानगी

Patil_p

हॅरी ब्रुक, गार्डनर सर्वोत्तम क्रिकेटपटू

Patil_p

गार्सिया हैद्राबाद एफसीशी करारबद्ध

Patil_p

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी पी. टी. उषा

Patil_p