Tarun Bharat

म्हापशात भिंतीला भोक पाडून 3.20 लाखाची चांदी पळवली

मंगळवारी रात्री चोरी केल्याचा अंदाज

प्रतिनिधी /म्हापसा

म्हापसा कदंब बसस्थानकासमोर असलेल्या ब्रागांझा इमारतीच्या तळमजल्यातील श्री ज्वेलर्स गोल्ड सिलवर पॉईंट या दुकानात अज्ञात चोरटय़ांनी दुकानामागच्या भिंतीला भोक पाडून आतमध्ये प्रवेश केला आणि सुमारे 4 किलो चांदी (अंदाजित किमंत 3 लाख 20 हजार रुपये) चोरून नेली. विशेष म्हणजे तिजोरीला चोरटय़ांनी हात न लावल्याने मोठी चोरी टळली.

 सिनेस्टाईलने ही चोरी केली असून आतमध्ये जाण्यास लहान मुलांचा वापर केला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या या सराफी दुकानात चोरी झाल्याने पोलीस खडबडून जागे झाले आहेत. पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास लावत आहेत.

ही चोरी मंगळवारी रात्री झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दररोजच्या प्रमाणे दुकानमालक दुकान सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान बंद करून गेले होते. ब्रागांझा इमारतीमध्ये बांधकाम चालू असून आतमध्ये तळमजल्यावर बुधवारी सकाळी इमारतीचे मालक रायन ब्रागांझा आपले काम पाहण्यासाठी गेले असता भिंतीला भले मोठे भोक पाडल्याचे आढळून आले. त्यांनी घटनेची माहिती त्वरित दुकानमालक व आपल्या हॉटेलातील व्यवस्थापकाला दिल्यावर याबाबत रितसर तक्रार म्हापसा पोलिसांना देण्यात आली. म्हापसा पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले.

पाठीमागच्या पॅमेराची दिशा बदलली

घटनास्थळी आल्यावर पाठीमागून भिंतीला मोठे भोक पाडून अज्ञात चोरटय़ांनी आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केला असला तरी आतमध्ये लहान मुलगा वा बारिक इसम गेला असावा, असे भोक पाहता अंदाज काढला जात आहे. आतमधील चांदीच्या वस्तू, सुमारे 4 किलो वजनाच्या अज्ञात चोरटय़ानी चोरून नेल्या. आत प्रवेश करण्यापूर्वी चोरटय़ांनी पाठीमागे असलेल्या सीसीटीव्ही पॅमेराची दिशा बदलून ठेवली होती, असे दिसून आले.

चोरटय़ांनी चांदीचा बॉक्स मागच्या बाजूला काढून ठेवल्याचे आढळून आले. तसेच जे भोक पाडले त्या भोकाचा दगड बाहेर पदपथावर ठेवल्याचे दिसून आले. चोरटय़ांनी पूर्वी निरीक्षण करून ही चोरी पूर्वनियोजित पद्धतीने केल्याचा अंदाज आहे. या चोरीत दोघांहून अधिकजणांचा हात असावा, असा पोलिसांचा कयास आहे.

पॅमेरे नादुरुस्त असल्याने चोरटय़ांचे फावले : पोलीस

गांधी चौक येथे पालिकेने भले मोठे पॅमेरे बसविले होते, मात्र त्या पॅमेरांमध्ये बिघाड झाल्याने ते नादुरुस्त आहेत. म्हापसा पोलिसांनी पालिकेत पत्रव्यवहार करून पॅमेरांची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. तसेच नव्याने पॅमेरे घालण्याचा ठराव यापूर्वी असलेल्या पालिका मंडळात घेण्यात आला होता. मात्र पॅमेरे दुरुस्तीचे काम आर्थिक बाबीमुळे अडकून पडले. हे पॅमेरे सुरू असते तर चोरटय़ांना पकडण्यास मदत झाली असती अशी माहिती निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिली.

पोलीस निरीक्षक शोबित सक्सेना, उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई, निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. श्वानपथकाचा वापर केला.  ठसे तज्ञानी तपासणी केली. उपनिरीक्षक सुनिल पाटील यांनी घटनेचा पंचनामा केला. सुशांत चोपडेकर, अनिल परुळेकर, फ्रँकी वाझ आदी एलआयबी टीम अधिक तपास करीत आहे.

Related Stories

अर्थसंकल्पात शिक्षण खात्याला भरीव तरतूद

Amit Kulkarni

मुरगाव हिंदू समाजाच्या घुमट आरती स्पर्धेत श्री राष्ट्रोळी दामोदर आरती मंडळ प्रथम

Amit Kulkarni

पाच पालिकांसाठी 66.70 टक्के मतदान

Amit Kulkarni

गोव्यात २९ एप्रिलपासून लॉकडाऊन

Archana Banage

आत्मज्ञान प्राप्तीसाठी गुरूला शरण जावे

Amit Kulkarni

स्त्रियांमध्ये समाजाचे सारथ्य करण्याचे सामर्थ्य…!

Patil_p