Tarun Bharat

म्हापसा जिल्हा आझिलोत मुख्यमंत्र्यांची अचानक भेट

जाणून घेतल्या कोविड रुग्णा विषयी माहिती : अन्य एक कोविड काऊंटर, मंडप उभारण्याचा आदेश

प्रतिनिधी / म्हापसा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सकाळी म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात अचानकपणे भेट देऊन कोविड रुग्ण व काऊंटरची पाहणी केली. म्हापसा आझिलो इस्पितळात सध्या मोठय़ा प्रमाणात तपासणीसाठी कोविड रुग्ण येत असल्याने त्यांच्याकडे लक्ष देणे कठीण होऊन बसते तसेच येथे गर्दी होत असल्याने काही रुग्णांना भर उन्हात बाहेर रांगेत उभे रहावे लागते. अशा तक्रारी मुख्यमंत्र्याकडे आल्याने मुख्यमंत्र्यांनी काल अचानकपणे म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात भेट देऊन पाहणी केली  व डॉक्टरांना विविध सूचना केल्या.

यावेळी म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा, आझिलो इस्पितळाचे अधीक्षक मोहनदास पेडणेकर, जनसंपर्क अधिकारी संदेश वंसकर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून इस्पितळातील समस्या जाणून घेतल्या. कोविड रुग्णांसाठी अन्य एक काऊंटर घालण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. शिवाय गर्दी होऊन जे रुग्ण वा तापसणीसाठी उन्हात राहतात त्यांच्यासाठी बाहेर एक मंडपही उभारण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

दरम्यान विदेशी नागरिक या इस्पितळात तपासणीसाठी येतात वा जे कुणी विदेशात जाणारे वा तात्काळ जाण्यासाठी येथे तपासणी करण्यासाठी येतात मात्र या इस्पितळात डॉक्टर्स फक्त 25 जणांचीच तपासणी करतात त्यामुळे गरजेसाठी वा तात्काळ येणाऱयांना नंबर अभावी परत जावे लागते वा दुसऱया दिवशी परत यावे लागते. काही जणांना डॉक्टर्सच्या बेपरवाईमुळे विमानाच्या तिकीटही रद्द कराव्या लागल्या आहेत अशा तपासणी करताना नंबर्सची सक्ती करू नये अशी माहिती येथील काहींनी पत्रकारांशी बोलताना दिली. याबाबत ही माहिती मुख्यमंत्र्यापर्यंत नेऊ असे ते म्हणाले.

Related Stories

चैतन्याच्या अनुभूती देणाऱया घुमट आरती…

Amit Kulkarni

कर्नाटकच्या खेळीमुळे सत्तरीतील नद्यांच्या प्रवाहावर परिणाम

Amit Kulkarni

मगो स्वबळावर 24 जागा लढणार

Amit Kulkarni

मद्य, रोकड, भेटवस्तू मिळून 2.44 कोटींचा ऐवज जप्त

Amit Kulkarni

मडगावातील फेस्ताच्या फेरीला 10 दिवस पूर्ण

Amit Kulkarni

किनारी भागात व्यवसायासाठी करणार अनुकूल वातावरण

Amit Kulkarni