Tarun Bharat

म्हापसा पालिकेच्या वॉर्ड क्रमांक 1 मधून चंद्रशेखर बेनकर यांच्या प्रचाराला सुरूवात

प्रतिनिधी / म्हापसा

म्हापसा पालिकेच्या वॉर्ड क्र. 1 मधून चंद्रशेखर बेनकर यांनी आपल्या प्रचाराला जोर धरला असून त्यांनी घरोघरी जाऊन गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. भाजप प्रदेश म्हापसा विकास आघाडीचे बेनकर हे उमेदवार असून त्यांच्यासमवेत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, निवडणूक प्रमुख रुपेश कामत, म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा आदी त्यांच्यासमवेत घरोघरी प्रचार करण्यास जात असल्याचे दिसून येत आहेत.

दरम्यान प्रचारावेळी प्रा. पार्सेकर म्हणाले की, घरोघरी प्रचाराची आणि वॉर्ड क्र. 1 मधून फेरी पूर्ण केली असून सर्व नागिरकांचा आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत dआहे. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जनतेला ज्या विविध योजना दिल्या आहेत त्याचे उत्तर जनता या निवडणुकीत देणार असल्याचे यावेळी प्रा. पार्सेकर यांनी सांगितले. यावेळी उमेदवार चंद्रशेखर बेनकर म्हणाले की, वॉर्ड क्र. 1 मधून जनतेच्या सर्वतोपरी मागण्या मान्य केल्या असून जी बेरोजगारी आहे ती सोडविण्यास आपण भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांच्या सहकार्याने वॉर्डातील समस्या सोडविण्याकडे भर देणार असल्याची माहिती दिली.

Related Stories

मोरपिर्ला क्षेत्रात आजपासून 14 दिवस ‘स्वेच्छा लॉकडाऊन’

Omkar B

इंधनानंतर आता वीज दरवाढीची शक्यता

Amit Kulkarni

अश्लिलताप्रकरणी पतीसह पूनम पांडे गजाआड

Patil_p

जनतेने सध्या पाण्याची बिले भरु नये : मुख्यमंत्री

Amit Kulkarni

पर्ये येथे घराची भिंत कोसळून नुकसान

Amit Kulkarni

लोलयेच्या गाळवाडय़ावर पाण्याची गंभीर समस्या

Omkar B