Tarun Bharat

म्हापसा बाजारपेठेतील शौचालय, रस्ते दुरुस्ती व गटार उपसणे काम पालिकेने त्वरित हाती घ्यावे

म्हापसा व्यापारी संघटनेची नगराध्यक्षांकडे मागणी

प्रतिनिधी /म्हापसा

म्हापसा व्यापारी संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीपाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी म्हापसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांची भेट घेऊन त्यांना म्हापसा बाजारपेठेत भेडसावणाऱया समस्याबाबत एक निवेदन सादर करून म्हापसा बाजारपेठेकडे देऊन या समस्या त्वरित मार्गी लावाव्यात अशी मागणी केली.

या निवेदनात म्हटल्याप्रमाणे म्हापसा बाजारपेठेत सध्या शौचालयाची मोठी समस्या असून येथील शौचालये तुंबलेली आहेत. शौचालये बंद असल्याने म्हापशात येणाऱया नागरिकांची बरीच धांदल उडते. बाजारपेठेत मध्यभागी असलेल्या हॉटेल शांतादुर्गा जवळील शौचालयाचा त्यात समावेश असल्याचे ते म्हणाले. ही समस्या अनेक वर्षापासून तशीच पडून असून या शौचालयाचे तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. असे म्हटले आहे. इतर जे बाजारपेठेत शौचालय आहेत तेही नादुरुस्त असून अनेकदा ते बंद अवस्थेत पहायला मिळततात. याबाबत कारण विचारल्यास येथे पाण्याअभावी ते बंद ठेवावे लागतात. म्हापसा बाजारपेठेतील ही प्रमुख समस्या असून ती त्वरित सोडविणे काळाची गरज असल्याची माहिती शिष्टमंडळाने नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांना दिली.

शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन नगराध्यक्षा म्हणाल्या की, आज म्हापसा नगरपालिकेत झालेल्या बैठकीत हॉटेल शांतादुर्गा जवळील नादुरुस्त शौचालयाच्या विषयावर नगराध्यक्षांनी माहिती देताना सांगितले की, एका प्रायव्हेट कंपनीने हे शौचालय पूर्णपणे मोफत नूतनीकरण करून देण्याचा प्रस्ताव पालिकेला दिला आहे. पण विरोधी पक्षातील नगरसेवक या प्रस्तावाला विरोध करीत आहे. शौचालय ही एक प्राथमिक गरज असल्याने प्रसारमाध्यमांच्या द्वारा म्हापसा व्यापारी संघटना म्हापसा पालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवकांना आवाहन व विनंती करीत आहे की त्याने या कामामध्ये आडकाठी आणू नये व टॉयलेटच्या नूतनीकरणाच्या कामात पालिकेला सहकार्य करावे.

म्हापसा बाजारपेठ ही राज्यात सर्वत्र प्रसिद्ध आहे मात्र आज बाजारपेठेतील रस्त्यांची दुरावस्था झाली असून हे रस्ते त्वरित दुरुस्त करून रस्त्यावर पडलेल्या चर बुझवून त्यावर डांबरीकरण करणे अत्यावश्यक असल्याची माहिती यावेळी अध्यक्ष श्रीपाद सावंत, सहसचिव पांडुरंग सावंत, गौरेश डांगी यांनी यावेळी नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांना दिली. म्हापसा बाजारपेठेत असलेल्या गटार अपसून ते साफ करणे अत्यावश्यक असून पावसाळय़ापूर्वी हे काम हाती घ्यावे अशी मागणी यावेळी राजेंद्र पेडणेकर, रुपेश शिंदे, वल्लभ मिशाळ, विशाल फळारी, गीतेश डांगी यांनी केली.

नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन आपण यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, म्हापसा बाजारपेठेतील कामे तशी हाती घेण्यात आली आहे. छोटी कामे टप्प्या टप्प्याने हाती घेऊ. सरकारी दरबारकडून 50 लाख येणे बाकी आहे. निवडणुकामुळे ते राहिले होते. ते आल्यावर ही सर्व कामे त्वरित हाती घेण्यास येणार असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी मार्केट चेअरमन नगरसेवक विराज फडके, नगरसेवक साईनाथ राऊळ, आशीर्वाद खोर्जुवेकर, अभियंता मुन्ना मुझावर उपस्थित होते.

म्हापसा बाजारपेठेतील छोटय़ा छोटय़ा समस्या शेखर नाईक सोशल मिडियावर दाखवून म्हापशाचे नाव राज्यात सर्वत्र खराब करीत असल्याचा आरोप यावेळी पालिका शिष्टमंडळ तसेच नगराध्यक्षांनी केला. नाहक छोटय़ा छोटय़ा गोष्टींसाठी म्हापशाचे नाव नाहक खराब करू नये असे यावेळी सांगण्यात आले.

या शिष्टमंडळात सचिव सिद्धेश राऊत, सहसचिव पांडुरंग सावंत, खजिनदार जितेंद्र फळारी, सहसचिव विशाल फळारी, सदस्य गितेश डांगी, राजेंद्र पेडणेकर, रुपेश शिंदे, वल्लभ मिशाळ उपस्थित होते.

Related Stories

पर्वरी – आल्त बेती येथील शांतादुर्गा पिळर्णकरीण मंदिरात भक्तीसंगीत कार्यक्रमाचं आयोजन

Amit Kulkarni

डोंगरी संगीत शारदा विद्यालयाच्या बाल कलाकारांचा गौरव

Amit Kulkarni

ड्रग्सचा नायनाट करण्यासाठी जनतेने पोलिसांना सहकार्य करावे

Amit Kulkarni

फातोर्डात विकासकामे थांबविल्याने रास्ता रोको

Omkar B

देव बोडगेश्वराचा 29 वा वर्धापनदिन उत्साहात

Patil_p

जाहीर प्रचार संपला, आता ‘अंडर ग्राऊंड’!

Amit Kulkarni