Tarun Bharat

म्हापसा बाजारपेठ चाळीस टक्के खुली

Advertisements

जागा मिळविण्यासाठी विक्रेत्यांची झुंबड पहिल्याच दिवशी लोकांची एकच गर्दी

प्रतिनिधी / म्हापसा

लॉकडाऊनमुळे गेल्या सुमारे चाळीस दिवसांपासून बंद असलेली म्हापसा बाजारपेठ सोमवार दि. 4 मे पासून अंशतः सुरू झाली आहे. यासंदर्भात म्हापसा व्यापारी संघटनेने आमदार जोशुआ डिसोझा आणि नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांच्याशी पाठपुरावा करून त्यांना निवेदनही सादर केले होते. सध्या बाजारातील सुमारे चाळीस टक्के दुकाने सुरू करण्यात आली व यासंदर्भात प्रत्येक दोन दिवसांनी पाहणी करून टप्प्याटप्प्याने अन्न दुकानेही सुरू करण्यात येतील अशी माहिती नगराध्यक्षांनी दिली. लॉकडाऊननंतर आज पहिल्याच दिवशी बाजारपेठ सुरू होणार असल्याची माहिती मिळाल्यावर नागरिकांनी खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केल्याचे पहायला मिळाले. म्हापसा व्यापारी संघटनेने दुकाने सुरू करण्याचे प्रयत्न केले असले तरी काही दुकानदार अद्याप भितीच्या छायेखाली असल्याचे एकूण परिस्थितीवरून दिसून आले. यावेळी शिष्टमंडळातील अवघेच व्यापारी बाजारपेठेत दिसून आले.

जागा अडविण्यासाठी विक्रेते पहाटेच हजर

म्हापसा बाजारपेठ सुरू होणार या उद्देशाने सकाळी 6.30 वाजताच स्थानिक विक्रेत्यांनी आपले बस्तान बाजारपेठेत बाहेरील रांगेत मांडले होते. काहींनी प्लास्टिक घालून जागा अडवून ठेवली होती मात्र याबाबत नगराध्यक्ष रायन ब्रागांझा, नगरसेवक फ्रँकी कार्व्हालो, निरीक्षक नरसिंह राटवड, शेखर नाईक आदींनी तसेच व्यापारी संघटनेच्या काही पदाधिकाऱयांनी बाजारपेठत फेरफटका मारून पाहणी केली.

प्रथम येणाऱयांना प्रथम स्थान. जागा कायमस्वरूपी नाही

याबाबत नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांना छेडले असता ते म्हणाले की, सध्या कपडे दुकानदारांच्या समोर बाहेरील रांगेत स्थानिकांना बसण्यास दिले आहे. येथे रांगा मारून दिल्याने काही स्थानिक विक्रेत्यांनी आपापणासाठी जागा अडवून ठेवलेल्या पहायला मिळाल्या. विशेष म्हणजे एकाच रांगेत कुटुंबातील दोघां तिघांनी आपल्यास बाजारपेठेत बसण्यासाठी जागा अडवून घेतलेल्या पहायला मिळाल्या याबाबत नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांच्याशी चौकशी केली असता आम्ही ही जागा तात्पुरती दिलेली आहे. प्रथम जो कुणी यील त्याला प्रथम स्थान या तत्त्वावर आम्ही येथे बसण्यास दिलेले आहे. असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या काळात ही अशीच व्यवस्था असेल असे ते म्हणाले. बाजारपेठेतील 40 टक्के दुकाने व्यापारी वर्गांनी खुली केली होती मात्र बाजारपेठेत तसे जास्त ग्राहक आढळून आले नाही. काहींनी खूप दिवसांनी आपली दुकाने खोलल्याने त्यांच्या चेहऱयावर आनंद दिसून आला. म्हापसा बाजारपेठेत सर्वत्र गटारे खोदून ठेवल्याने आतमध्ये येणे त्यांना त्रासदायक झाले.

दुकान विक्रे खुले मात्र वाहतूक व्यवस्था खोळंबली

म्हापसा बाजारपेठेत जरी काही दुकाने खुली केली असली तरी वाहतूक करणाऱयांना आपल्या दुचाक्या तसेच कार युनियन फार्मसी म्हापसा हायस्कूल जवळील गल्लीत पार्क करून ठेवाव्या लागल्या जेणेकरून याबाजूंने वाहतूक करणाऱयांना बरेच त्रास सहन करावे लागले. मार्केट काही प्रमाणात खुले केले असले तरी पार्किंगची व्यवस्था मात्र योग्यरित्या करण्यात आली नाही. काही जणांना योग्यरित्या पार्किंग अभावी भुदंडही स्विकारावा लागला. म्हापशात मात्र वाहतूक खोळंभल्याने वाहतुकीची त्रेधातिरपीट झाल्याचे पहायला मिळाले.

काही विक्रेते उशीरा आल्याने त्यांनी जागेअभावी नाराजी व्यक्त केली. आम्ही गेली अनेक वर्षे म्हापसा बाजारपेठेत आमचे सामान घेऊन बसतो मात्र यावेळी आम्हाला योग्य जागा दिली गेली नसल्याचा आरोप स्थानिक महिला वर्गांनी केला. त्यांना मार्केट निरीक्षक नरसिंह राटवड तसेच नगराध्यक्षांनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र काहीजण समजून घेण्याच्या प्रयत्नात नव्हते. उद्यापासून सर्वकाही  व्यवस्थित होणार असल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली. आज पहिलाच दिवस असून आम्ही त्यांना प्रायोजित तत्त्वावर बसायला दिल्याचे नगराध्यक्षआंनी सांगितले.

बाजारपेठेत अडथळा करणारे सामान उचलले

काही विक्रेत्यांनी बाजारपेठेत आतमध्ये दुकानापुढे आपले सामान विक्रीस ठेवले होते. मुख्याधिकाऱयांच्या आदेशानुसार अडथळा करणारे सर्व सामान पालिकेतर्फे उचलण्यात आले. ार्केट निरीक्षक नरसिंह राटवड यांच्या नेतृत्वाखाली पालिका कर्मचारी वर्ग सर्वत्र बारकाईने लक्ष ठेवून होते.

सध्या बाजारपेठेतील भाजी फळे, फुले, मासे, चिकन, मटण व अन्य मांस यांची बंदी लॉकडाऊनपर्यंत बंदच ठेवण्यात आली आहे. तसेच फिरत्या विक्रेत्यांना परवानगी दिलेली नाही. बाजारपेठ सकाळी 8 ते सायं. 6 पर्यंत खुली ठेवण्यात येईल. टॅक्सीस्थानक व टेंपोस्थानक परिसरात पारंपरिक विक्रेत्यांची व्यवस्था काही दिवसांत करण्यात येईल असेही नगराध्यक्ष म्हणाले. याप्रसंगी बोलताना आमदार जोशुआ डिसोझा यांनी सांगितले की, म्हापसा ही गोव्यातील सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे लोकांची गरज ओळखून ही बाजारपेठ विविध टप्प्यात पुन्हा सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.

Related Stories

अज्ञाताकडून विद्यार्थ्याची चौकशी; हायस्कूलमध्ये खळबळ

Patil_p

पर्येत भिरोंडा, पिसुर्ले भागात पाणी समस्या त्रस्त नागरिकांचा मोर्चा काढण्याचा इशारा

Amit Kulkarni

ओल्ड गोव्याचा ग्रेटर पणजीमध्ये समावेश रद्द

Patil_p

दोड्डा गणेशचा गोवा रणजी संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

Amit Kulkarni

विरोधीपक्षाने पंतप्रधानांना खलाशांची आकडेवारी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांना जाग

Omkar B

तिस्क पीडीए मार्केटमधील व्यापाऱयांच्या डोक्यावर टांगता धोका

Amit Kulkarni
error: Content is protected !!