प्रतिनिधी / म्हापसा
म्हापसा कळंगूट दरम्यान जाणारी मुख्य पाण्याची पाईपलाईन गुरुवारी सायं. 5 वाजण्याच्या दरम्यान येथे रस्ता रुंदिकरणासाठी खोदकाम सुरू असताना जेसीबी लागून मुख्य पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. दरम्यान घटनेची माहिती पाणी पुरवठा खात्याच्या अभियंता वर्गास दिल्यावर त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार म्हापसा ते काणका दरम्यान रस्ता रुंदिकरण काम सुरू असतानाच पाईपलाईन जेसीबीद्वारे फुटल्याने पाण्याचे फवारे मुख्य पाईपलाईनमधून बाहेर येऊ लागले. ही मुख्य पाईपलाईन कळंगूट मतदारसंघात गेल्याने या मतदारसंघात गुरुवारी व शुक्रवारी पाण्याची टंचाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान अभियंता वर्गांनी पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.