Tarun Bharat

म्हापसा भोवताल परिसरातील दुचाक्या चोरणाऱया अट्टल चोरटय़ास अटक

Advertisements

प्रतिनिधी/ म्हापसा

म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनिल पाटील व त्यांच्या पोलीस पथकांनी म्हापशात चोरी होणाऱया दुचाक्याच्या अट्टल चोर युराज राजेश गुजराथी (19) रा. वेर्ला काणका व त्याच्या इतर अल्पवयीन दोघां साथीदारांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून पाच दुचाक्या जप्त केल्या. युराज याचा राज्यात झालेल्या दुचाक्या चोरीमध्ये समावेश असून म्हापसा पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.

पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार युराज याच्याकडून पोलिसांनी यामाहा आर 15 मोटारसायकल, एक एनटॉक स्कूटर, हिरो स्प्लेंडर मोटारसायकल, एक एप्रिलया या दुचाक्यांचा यात समावेश आहे. या सर्व दुचाक्यांचे नंबरप्लेट काढण्यात आले असून म्हापसा पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील व त्यांचे पोलीस पथक हवालदार आल्वीटो डिमेलो, हवालदार सुशांत चोपडेकर, शिपाई राजेश कांदोळकर, प्रकाश पोवळेकर, अभिषेक कासार, अक्षय पाटील, आनंद राठोड यांनी ही कारवाई करून दुचाक्या जप्त केल्या.

चोरीच्या दुचाक्या कुचेली झाडीत लपविल्या याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार युराज गुजराथी याने या गाडय़ा चोरल्यावर सर्व कुचेली म्हापसा येथे जंगल भागात झाडीत लपवून ठेवल्या होत्या तर एका एप्रिलया पांढऱया रंगाच्या दुचाकीने नंबर काढून तो फिरत होता. यापूर्वी म्हापसा पोलिसांनी वर्षापूर्वी दुचाकी गाडी चोरी प्रकरणी अटक केली होती. त्याने अन्य गाडय़ाही चोरल्याचा पोलिसांचा संशय असून म्हापसा पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. उपनिरीक्षक सुनिल पाटील यांनी चोरटय़ांना पकडण्यास बरेच परिश्रम घेतले. म्हापसा व भोवताल परिसरात दुचाक्या बेपत्ता झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्याला अनुसरून म्हापसा पोलिसांनी चौकशी सुरू केली असता युराजच्या दिशेने पोलिसांची चक्रे वाढू लागल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. हे सर्व मिळून अमली पदार्थांचे सेवनही करीत असतात अशी माहिती पोलिसांना लागली असून म्हापसा पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.

Related Stories

लोबोंचा आज भाजपला रामराम

Amit Kulkarni

पोलीस तक्रार प्राधिकरणावर सदस्यपदी शुक्ला यांची वर्णी

Omkar B

गोवा वेल्हा येथील अपघातात 1 ठार

Amit Kulkarni

म्हादई प्रत्यक्ष पाहणीवेळी कर्नाटकची दंडेलशाही

Amit Kulkarni

गोवा फॉरवर्ड एनडीएतून बाहेर

Amit Kulkarni

मांदे येथे शॅकला आग; सात लाखांची हानी

Amit Kulkarni
error: Content is protected !!