Tarun Bharat

म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव देणगी कुपन विक्री शुभारंभ

Advertisements

प्रतिनिधी /म्हापसा

म्हापसा पालिका बाजारातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्य उत्तम व स्फूर्ती देमारे आहे. मंडळाने आजपर्यंत गणेश भक्ताचा विश्वास संपादन केला आहे. गणेशोत्सव मंडळाने काढलेल्या देणगी कुपन विकत घेऊन गणेशोत्सव मंडळाच्या भविष्यकालीन भव्य व दिव्य योजना पूर्ण करण्यास हातभार लावूया असे प्रतिपादन नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांनी पालिका प्रवेशद्वारावर देणगी कुपनचा विक्री करण्याच्या शुभारंभप्रसंगी बोलताना केले.

यावेळी गणेशोत्सव विश्वस्त मंडळाचे प्रमुख विश्वस्त अवधूत नार्वेकर, सचिव जयप्रकाश पारकर, भाई मोये, तुषार टोपले, शिवानंद धावजेकर, ऍड. राजेश नार्वेकर, प्रेमानंद दिवकर, एकनाथ म्हापसेकर, रमेश मणेरकर, विनायक दिवकर, श्यामसुंदर पेडणेकर, संतोष बामणे, विठू पोवळेकर, सुरज डांगी, शब्देश पोवळेकर, सचिन किटलेकर, अचुत वेर्णेकर उपस्थित होते.

विश्वस्त ऍड. राजेश नार्वेकर यांनी गणेशोत्सव मंडळाच्या 60 वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला. आज आमचा गणराया दगडू शेट हलवाईच्या दिशेने वाटचाल करीत आहे. गणेशोत्सव मंडळ दरवर्षी 360 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतो, रक्दान शिबिर, बालनाटय़ शिबिराचे दरवर्षी आयोजन केले जाते. गावसवाडा येथे सिद्धीविनायक भवनाचे बांधकाम चालू आहे असे त्यांनी सांगितले. विश्वस्त अध्यक्ष अवधूत नार्वेकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन व आभार विश्वस्त तुषार टोपले यांनी मानले. नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांच्याहस्ते 100 रुपये किंतीच्या देणगी कुपनाच्या विक्रीचा शुभारंभ केला. यंदा पाच मोटरसायकल व आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे.

Related Stories

पणजीकरांनी मनपाचे थकविले 35 कोटी!

Omkar B

मांद्रेचा प्रसिध्द भजनी सप्ताह आज उद्या समाप्ती

Patil_p

‘विठू’च्या गजराने मठग्राम नगरी दुमदुमली

Amit Kulkarni

डिचोली पालिकेच्या 14 प्रभागांसाठी 88 टक्के मतदान.

Patil_p

न्यायालयाच्या दडपणामुळेच हेडलॅण्ड सडय़ावरील नाफ्ता खाली करण्यात यश

Patil_p

दहावीची मुख्य परीक्षा आजपासून

Omkar B
error: Content is protected !!